Download App

IND vs AUS 3rd T20I : टीम इंडियाचं कुठं चुकलं? सुर्यकुमारने केला मोठा खुलासा

IND vs AUS : गुवाहाटीच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा(Australia) स्टार फलंदाज ग्लेन मॅक्सवेलची (Glenn Maxwell ) जादू दिसली. एकवेळ भारताचा ताब्यात असलेल्या सामना मॅक्सवेलने फिरवत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला आहे. ग्लेन मॅक्सवेलने पुन्हा एकदा ट्वी-20 स्फोटक शतक झळकविले आहे. प्रसिद्ध कृष्णाच्या शेवटच्या चेंडूवर मॅक्सवेलने चौकार मारत ऑस्ट्रेलियाला पाच विकेटने विजय मिळवून दिला आहे. याचबरोबर पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत आजचा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने कमबॅक केले आहे. भारत हा सामना जिंकेल असे वाटत होते. मात्र काय चूक झाली याचा खुलासा कर्णधार सूर्यकुमार यादवनेच (Suryakumar Yadav) केला आहे.

शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाला 43 धावांची गरज होती. पण यादवने 19 वी ओव्हर फिरकीपटू अक्षर पटेलला दिली. या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी 22 धावा काढल्या. यादव म्हणाला, आम्ही मॅक्सवेलला लवकर आऊट करण्याच्या प्रयत्नात होतो. तीच आमची प्लॅनिंग होती. पण, या मैदानावर ओलावा जास्त होता. यामुळे गोलंदाजांना जास्त अडचणी जाणवत होत्या.

Ind vs Aus: गुवाहाटीत ऋतुराजचे वादळ ! ऑस्ट्रेलियाची धुलाई करत टी-20 त झळकविले पहिले शतक

अक्षरने याआधीच्या सामन्यातही 19 आणि 20 वी ओव्हर टाकलेल्या आहेत. या शेवटच्या ओव्हर्समध्ये कशी गोलंदाजी करायची याचा अनुभव त्याच्याकडे आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये अनुभवी गोलंदाजानेच गोलंदाजी करावी असे माझे मत होते. ऋतुराज गायकवाडनेही शानदार फलंदाजी केली. त्यामुळे सामना गमावला तरी खेळाडूंच्या प्रदर्शनामुळे मी समाधानी आहे, असे सूर्या म्हणाला.

गायकवाडचे शतक व्यर्थ

भारताचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad ) विश्वविजेता ऑस्ट्रेलियाची (Australia) गोलंदाजी फोडून काढली. ऋतुराजने स्फोटक खेळत टी-20 क्रिकेटमधील पहिले शतक झळकाविले. पाच टी-20 सामन्याच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऋतुराजने 52 चेंडूत शतक ठोकले. तो 123 धावांवर नाबाद राहिला. ऋतुराजने आपल्या खेळीत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. त्याने 13 चौकार आणि 7 षटकार मारले. टी-20 मध्ये शतक झळकविणारा ऋतुराज हा भारताचा नववा फलंदाज ठरला. भारताने ऑस्ट्रेलियासमोर 223 धावांचा डोंगर उभा केला. ऑस्ट्रेलियाने शेवटचे षटक ग्लेन मॅक्सवेलला टाकण्यासाठी दिले. परंतु कर्णधार मॅथ्यू हेडचा हा निर्णय चुकीचा ठरला. मात्र यानंतरही ऑस्ट्रेलियाने भारताच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला त्यामुळे ऋतुराजचे शतकही भारताल विजयी करू शकले नाही. आता पुढील सामन्यात सामना जिंकण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल.

IND vs PAK : वर्ल्डकपनंतर पुन्हा भारत-पाक भिडणार; ‘या’ दिवशी होणार हायहोल्टेज सामना

Tags

follow us