Download App

Ind Vs Aus : रोमहर्षक सामन्यात कांगारुंना नमवलं; भारताचा 2 गडी राखून विजय

Ind Vs Aus : भारताने विश्वचषक गमावला पण टी-20 च्या पहिल्या सामन्यात कांगारुना नमवलं आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला दिलेलं 209 धावांचं लक्ष्य पूर्ण केलं आहे. भारताने 3 गडी राखून ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने 19.5 मध्ये 215 धावांचं लक्ष्य गाठलं आहे. टी-20 सिरीजचा पहिला सामना आज विशाखापट्टणमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात भारताचा विजय झाला आहे. भारताचे स्टार फलंदाज सुर्यकुमार यादव आणि इशांत किशन दोघांनीही धुव्वादार बॅटींग केली आहे. इशांतपाठोपाठ सुर्यानेही अर्धशतक ठोकल्याने भारताच्या विजयासाठी योगदान मिळालं आहे.

आरोग्यासाठी एडीबीकडून 500 दशलक्ष US डॉलर्सचे सहाय्य, फडणवीसांनी मानले मोदींचे आभार

भारताने 209 धावांच लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेले सलामीवीर फलंदाज यशस्वी जायस्वाल आणि ऋतुराज गायकवाड झटपट बाद झाले होते. भारताला एकापाठोपाठ दोन धक्के बसल्यानंतर ईशान किशन आणि सूर्याने टीम इंडियाचा डाव सावरल्याचं पाहायला मिळालं. 10 षटकानंतर भारताने दोन गड्यांच्या मोबदल्यात 106 धावांवर मजल मारली होती.

Maratha Reservation : ‘आमचं आग्या म्हवाळ खवळलं तर…’; मनोज जरांगेंनी भुजबळांना धुतलंच

भारताची लक्ष्याकडे वाटचाल सुरु असतानाच भारताला ईशान किशनच्या रुपात तिसरा धक्का बसला होता. ईशाने धुव्वादार बॅटींग करीत अर्धशतक झळकावले, त्यानंतर विकेट सोडली. त्यानंतर ईशान पाठोपाठच शामीदेखील बाद झाला. कर्णधार सूर्यकुमार यादव याने झंझावती अर्धशतक ठोकले. सूर्याने 32 चेंडूत 56 धावा केल्या आहेत.

टीमला दोनवेळा वर्ल्ड चॅम्पियन बनविलेल्या खेळाडूवर ICC ची कारवाई; क्रिकेटपासून लांब रहावं लागणार!

त्यानंतर तिलक वर्माच्या रुपाने भारताला चौथा धक्का बसला होता. तिलक वर्माला 10 चेंडूत 12 धावांवरच समाधान मानावं लागलं. 12 धावा करुन वर्मा तंबूत परतला होता. भारताने चार विकेटच्या मोबदल्यात 14.5 षटकानंतर 154 धावांवर मजल मारली होती. त्यानंतर लगेचच सुर्यकुमारच्या रुपात भारताला पाचवा धक्का बसला होता. सुर्यकुमार यादवने धुव्वादार बॅटिंग करीत 42 चेंडूमध्ये 80 धावांची खेळी केली.

SET Exam : भावी प्राध्यपकांसाठी आनंदाची बातमी! नेट प्रमाणे सेटही वर्षातून दोनदा होणार

दरम्यान, सेकंड लास्ट चेंडूत रिंकू सिंहने षटकार मारत भाराताला विजय मिळवून दिला आहे. एका चेंडूवर एका धावेची गरज असताना रिंकूने विजयी षटकार मारुन भारताला दणदणीत विजय मिळवून दिला आहे. भारताने पहिल्याच सामन्यात विजय मिळवून 5 टी-20 मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली आहे.

Tags

follow us