Download App

IND vs AUS 2023: जाडेजावर बॉल टॅम्परिंग आरोपानंतर, वसीम जाफरने ऑस्ट्रेलियन मीडियाची उडवली खिल्ली

IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs Aus) यांच्यात सुरु बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023 स्पर्धेतील पहिला सामना नागपुरात सुरु आहे. या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताच्या रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) ऑस्ट्रेलियाला चांगलीच धूळ चारली आहे. ज्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ १७७ धावांवर सर्वबाद झाला. दरम्यान ऑस्ट्रेलियन मीडियाला हे सहन झालं नाही आणि त्यांनी जाडेजावर थेट बॉल टॅम्परिंगचा गंभीर आरोप केला आहे. यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने (Wasim Jaffer) देखील एक मीम ट्विट करुन ऑस्ट्रेलियन मीडियासह ऑस्ट्रेलियन क्रिकेटची जोरदार खिल्ली उडवली.

ऑस्ट्रेलियन मीडियाचा आरोप :

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याच्या पहिल्याच दिवशी जवळपास ६ महिन्यांनंतर दुखापतीतून परतलेल्या जाडेजाने एम. लबुशेन आणि स्टीव्ह स्मिथसह ५ दमदार ऑस्ट्रेलियन खेळाडूंना बाद केले. (Australian Media) यामुळे त्याचा संघ केवळ १७७ धावांवर ऑलआऊट झाला. ही कामगिरी ऑस्ट्रेलिया संघाला सहन झाली नाही आणि तेथील प्रसारमाध्यमांनी एकापाठोपाठ एक अनेक आरोप करायला सुरुवात केली. गेल्या अनेक दिवसांपासून ऑस्ट्रेलियन मीडिया भारतातील खेळपट्टीविषयी बरेच आरोप करत होती. नागपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या फॉक्स क्रिकेट या वाहिनीने सर्वप्रथम खेळपट्टीवर सवाल उपस्थित केले होते. ही खेळपट्टी पाहुण्या संघासाठी योग्य नसल्याचं ते म्हणत होते. यानंतर ऑस्ट्रेलियन मीडियाने आणखी एक आरोप केला, जेव्हा त्यांचा सलामीवीर फलंदाज उस्मान ख्वाजा याला थर्ड अंपायरने आऊट म्हणून घोषित केलं. जेव्हा उस्मानला तिसऱ्या पंचाने डीआरएसद्वारे आऊट दिलं तेव्हा ऑस्ट्रेलियन मीडियाचा आरोप होता की भारताने डीआरएसमध्ये देखील छेडछाड केली.

व्हिडिओत काय आहे ?

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जेव्हा ऑस्ट्रेलियन संघाची धावसंख्या 5 विकेट गमावून 120 धावा होती आणि जडेजा गोलंदाजी करत होता, त्यावेळचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये जडेजा हा बॉल घेऊन मोहम्मद सिराजकडे पोहोचल्याचे दिसत होते. यावेळी सिराजच्या हातातून जडेजानं काहीतरी घेतलं आणि ते बॉलिंगच्या करणाऱ्या बोटावर लावायला सुरुवात केली. जडेजाने बराच वेळ तो पदार्थ बोटांना लावला आणि त्यानंतर त्याने बॉलिंग केली. परंतु, या व्हिडिओमध्ये जडेजा तो पदार्थ बॉलला लावत असलेला कुठंही दिसत नाही.

मायकल वॉननेही प्रश्न उपस्थित केला :

ऑस्ट्रेलियन मीडियाने जडेजाच्या व्हिडिओवर बातमी चालवली आणि विचारले की सिराजने जडेजाला काय दिले ? त्यांनी आपल्या बातमीत माजी कर्णधार मायकेल वॉनचे ट्विटही जोडले. वॉनने विचारले की, जडेजा त्याच्या बोटांना काय लावत आहे? यापूर्वी त्याने असे काही पाहिले नव्हते. त्याचवेळी ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार टिम पेननेही या व्हिडिओचे वर्णन ‘रंजक’ असे केले आहे.

जडेजाने बोटांना नेमकं काय लावले ?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये जडेजाने सिराजकडून घेतलेली वस्तू बॉलवर लावल्याचे कुठेही दिसत नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने सांगितले की जडेजा वेदना कमी करण्यासाठी त्याच्या बोटावर बाम लावत आहे. त्याने कोणत्याही प्रकारे चेंडूशी छेडछाड केली नाही.

वसीम जाफरकडून ऑस्ट्रेलियन संघासह मीडियाची खिल्ली :

या दरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरनेही ऑस्ट्रेलियन क्रिकेटसह मीडियाची काहीशी मस्ती घेत आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन एक मीम ट्वीट केलं. या ट्वीटमध्ये त्याने फॉक्स क्रिकेटने ट्वीट केलेल्या व्हिडीओसह मीम शेअर केला. या मीममध्ये लिहिलं आहे की, “हे रडणार हे मला माहित होतं, पण इतक्या लवकर रडणार हे वाटलं नव्हतं.

Tags

follow us