Download App

World Cup 2023: भारत-इंग्लंड सामन्यात ‘पावसा’चा सराव, खेळाडू पव्हेलियनमध्येच

World Cup 2023 : येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्ड कपमधील (World Cup 2023) भारताचा पहिला सराव सामना इंग्लंड विरुद्ध (IND vs ENG) खेळवला जाणार होता. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मात्र त्यानंतर पाऊस सुरू झाला. बर्‍याच वेळाने पाऊस थांबला आणि कव्हर्स काढेपर्यंत पुन्हा पाऊस सुरू झाला. त्यामुळे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रतीक्षा केल्यानंतर सराव सामना रद्द झाल्याचे घोषित करण्यात आले आहे.

भारताची वर्ल्ड कपची तयारी कशी होती?
एकदिवसीय विश्वचषकापूर्वी टीम इंडियाच्या कामगिरीवर नजर टाकली तर भारताची वर्षभर चांगली कामगिरी राहिली आहे. यामुळेच भारताला आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 चे प्रबळ दावेदार मानले जात आहे. संघात 11 खेळाडू खेळत असले तरी संघातील सर्व 15 खेळाडू सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत.

रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांची कामगिरी अप्रतिम राहिली आहे. त्याचबरोबर सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव हे देखील चांगले फॉर्ममध्ये आहेत.

मान्सून संपत आलाय! यंदा 94.4 टक्के पावसाची नोंद; एल निनोचा फारसा प्रभाव नाही

इंग्लंड संघाची ताकद काय?
गेल्या विश्वचषकापासून इंग्लंड क्रिकेट संघाने आक्रमक खेळाची शैली निर्माण केली आहे. ते नेहमीच आक्रमण करण्याच्या मूडमध्ये असतात पण भारतीय विकेट फिरकीला अनुकूल असतात त्यांच्या संघाला लक्षात ठेवावे लागेल. इंग्लंड संघात सध्या एकही प्रसिद्ध फिरकी गोलंदाज नाही, ही समस्या त्यांना सतावू शकते.

स्कॉटलंडमधील गुरुद्वारामध्ये उच्चायुक्तांना प्रवेश नाकारला, भारताची ब्रिटनकडे व्यक्त केली नाराजी

एकदिवसीय विश्वचषकाचे सराव सामने शुक्रवारपासून सुरू झाले. पहिल्या दिवसापासून हे सामने पावसाच्या सावटाखाली होते. काल दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला. आज भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामनाही पावसामुळे वाया गेला. ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्स यांच्यातील सामनाही पावसामुळे वेळेवर सुरू होऊ शकला नाही.

Tags

follow us