IND vs ENG Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना ( IND vs ENG Test ) रांची येथे सुरू आहे. या कसोटीच्या चौथ्या दिवशी भारत विजयाच्या अगदी जवळ पोहोचल्याचं चित्र आहे. तत्पूर्वी इंग्लंडने भारताला 192 धावांचं आव्हान दिलं होतं. दरम्यान भारताने तिसऱ्या दिवशीच्या खेळामध्ये नाबाद 40 धावा केल्या होत्या. चौथ्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी 152 धावांची गरज होती..
चौथ्या दिवशीचा खेळ सुरू झाल्यानंतर टीम इंडियाचा स्कोर 3 विकेटसह 100 धावा (सकाळी 11 वाजेपर्यंत) असा होता. त्यामध्ये कर्णधार रोहित शर्माने 55 धावा केल्या. मात्र त्यानंतर तो बाद झाला. रोहितनंतर फलंदाजीला आलेल्या रजत पाटीदारला भोपळा देखील फोडता आला आहे. दिवसाच्या सुरूवातीलाच यशस्वी जयस्वाल तंबूत परतला. सध्या खेळपट्टीवर शुभमन गिल आणि रवींद्र जडेजा तळ ठोकून आहेत. टीम इंडियाला आता केवळ 92 धावांची गरज आहे.
Box Office: ‘आर्टिकल 370’ची बॉक्स ऑफिसवर जादू; तिसऱ्याचं दिवशी केली एवढी कमाई
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघ बऱ्यापैकी मजबूत स्थितीत होता. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताला रांची कसोटी जिंकून मालिका जिंकाण्यासाठी थोडा संघर्ष करावा लागणार आहे. सध्या भारतीय संघ 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे.
तर दुसरीकडे इंग्लंड संघाला तिसरी कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी साधायची आहे. पण तिसऱ्या दिवशी रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी ज्या प्रकारे इंग्लिश गोलंदाजांविरुद्ध धावा केल्या, त्यामुळे बेन स्टोक्सच्या संघाला भारतीय फलंदाजांना रोखणे सोपे जाणार नाही.