IND vs ENG: बीसीसीआय घेणार मोठा निर्णय, ‘या’ तीन खेळाडूंची होणार भारतीय संघातून हकालपट्टी ?

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असणाऱ्या पाच टी20 सामन्यांच्या मालिकेतीन चौथ्या सामन्यात भारतीय संघाचा पराभव करत इंग्लंडने

IND Vs ENG

IND Vs ENG

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असणाऱ्या पाच टी20 सामन्यांच्या मालिकेतीन चौथ्या सामन्यात भारतीय संघाचा पराभव करत इंग्लंडने या मालिकेत 3-0 अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडविरुद्ध टी20 क्रिकेटमध्ये तब्बल 12 वर्षांनंतर भारतीय संघाने मालिका गमावल्यानंतर आता बीसीसीआय काही खेळाडूंवरवर मोठी कारवाई करण्याचे संकेत मिळत आहे.  सध्या सुरु असणाऱ्या इंग्लंड दौऱ्यावर आणि गेल्या महिन्यात झालेल्या आयर्लंड दौऱ्यावर भारतीय संघाने टी20 मालिका गमावल्याने चाहते खेळाडू, संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांवर जोरदार टीका करताना दिसत आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय पाचव्या टी20 सामन्यानंतर तीन खेळाडूंची संघातून हकालपट्टी करु शकते.

प्रसिद्ध कृष्णा

वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाची टी20 फॉरमॅटमधील कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. त्याने आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळला आणि दोन्ही सामन्यांत अत्यंत खराब कामगिरी केली. त्यामुळे, त्याला टी20 क्रिकेटमध्ये पुढील संधी मिळण्याची शक्यता खूपच कमी वाटते.

वॉशिंग्टन सुंदर

स्पिन अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरचे टी20 फॉरमॅटमधील स्थानही धोक्यात आले आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर तो सातत्याने अपयशी ठरत आहे, ज्यामुळे त्याला टी20 संघातून वगळले जाऊ शकते.

तिलक वर्मा

संघाचा उपकर्णधार तिलक वर्मा याची कामगिरीही निराशाजनक राहिली आहे. सलग सामन्यांमध्ये तो संथ गतीने फलंदाजी करत आहे आणि त्यानंतर खराब फटके मारून आपली विकेट गमावत आहे. त्यालाही संघातील स्थान गमवावे लागू शकते.

उपकर्णधारपद जाण्याची शक्यता

जर तिलक वर्माने अशाच प्रकारे खेळणे सुरू ठेवले, तर सर्वप्रथम त्याचे उपकर्णधारपद काढून घेतले जाईल. त्यानंतर, त्याला ‘प्लेइंग इलेव्हन’मधून वगळले जाऊ शकते आणि अखेरीस त्याला संपूर्ण संघातूनच बाहेर काढले जाऊ शकते.

झेडपीच्या निवडणुका पुन्हा लांबणार? कोर्टातील याचिकेनंतर आणखी एक अडथळा-

एकदिवसीय (ODI) संघातील स्थानही धोक्यात

या खेळाडूंचे एकदिवसीय संघातील स्थानही धोक्यात आहे. जर ते इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही अपयशी ठरले, तर ते केवळ टी20 संघच नव्हे, तर 2027 च्या आयसीसी विश्वचषकाच्या नियोजनातील आपले स्थानही गमावू शकतात.

Exit mobile version