Ind Vs NZ Who Will Win Champions Trophy Final : चॅम्पियन ट्रॉफीसाठी उद्या (दि.9) भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना खेळला जाणार आहे. आतापर्यंतचे सर्व सामने जिंकणारी टीम इंडियाच चॅम्पियन बनेल असा विश्वास आणि भाकीत प्रत्येक क्रिकेटप्रेमीने व्यक्त केले आहे. तर, दुसरीकडे चॅट चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) कोण जिंकणार असा प्रश्न जीपीटी, गुगल जेमिनीला विचारण्यात आला तेव्हा समोर आलेल्या उत्तराने आश्चर्यकारक उत्तरे दिली आहेत.
Varun Chakravarthy : आधी क्रिकेटर नंतर आर्किटेक्ट, नोकरीही केली; आता टीम इंडियाचा हिरो
चॅटबॉटला विचारण्यात आला प्रश्न
ओपनएआयच्या चॅटजीपीटी, गुगल जेमिनी आणि मायक्रोसॉफ्ट कोपायलट चॅटबॉट्सना भारत आणि न्यूझीलंडमधील अंतिम सामना कोणता संघ जिंकेल आणि का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर वरील सर्व चॅटबॉट्सनी भारत जिंकेल असे भाकीत केले आहे. पण चॅटबॉट प्रत्येक प्रश्नाचे अचूक उत्तरं देईल असे नाही पण तंत्रज्ञानाने दिलेल्या या उत्तरामुळे करोडो भारतीयांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे हे मात्र नक्की.
IND Vs NZ : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारत-न्यूझीलंडमध्ये रंगणार थरार; जाणून घ्या H2H रेकॉर्ड्स
Gemini ने सांगितलं अंदाज लावणं अवघड
Gemini ला भारत-न्यूझीलंड यांच्यातील कोणता संघ चॅम्पियन्स ट्रॉफिचा अंतिम सामना जिंकेल असे विचारण्यात आले. त्यावर जेमिनीने अंतिम सामन्यातील विजेता कोण असेल हे सांगणे कठीण आहे कारण दोन्ही संघ मजबूत आहेत असल्याचे म्हटले आहे. पण, त्यातही भारतीय संघ अधिक मजबूत असल्याचे जेमिनीने नमुद केले आहे. तसेच भारतीय संघाची फलंदाजीत डेप्थ असून, संघात रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल हे सामना जिंकणारे खेळाडू आहेत. जर भारतीय गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजी केली तर, भारत ट्रॉफी जिंकेल असे उत्तर जेमिनीने दिले आहे.
अंतिम सामना रद्द झाला तर भारत की न्यूझीलंड कोण होणार विजेता? जाणून घ्या ICC चा नियम
ChatGPT ने काय सांगितले?
जेमिनीसह चॅटजीपीटीलाही तोच प्रश्न विचारण्यात आला. त्यावर चॅटजीपीटीने म्हटले आहे की, भारतीय संघाचे दुबईमध्ये वर्चस्व आहे आणि त्यांनी यापूर्वीही येथे न्यूझीलंडला पराभूत केले आहे. विराट कोहली आणि श्रेयस अय्यरसारखे खेळाडू महत्त्वाचे ठरू शकतात. त्यामुळे भारत चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना जिंकू शकतो. तर, न्यूझीलंड संघही यापूर्वी पाच जागतिक स्पर्धांच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. फॉर्ममध्ये असलेले विल्यमसन आणि रचिन रवींद्र सारखे खेळाडू एक मजबूत आव्हान उभे करतील. त्यामुळे लढत कडवी होऊ शकते.
सावधान टीम इंडिया! किवी संघातील ‘हा’ भारतीय ठरेल धोकादायक; आकडे काय सांगतात?
मायक्रोसॉफ्ट कोपायलटने कोणत्या संघाला दिली गुडन्यूज
भारतीय संघाची कामगिरी सातत्याने उत्कृष्ट राहिली असून, तीन विजयानंतर खेळाडूंचा आत्मविश्वास अधिक उंचावला आहे. त्यामुळे सध्या संघ मजबूत स्थितीत असल्याचे दिसून येत असल्याचे मायक्रोसॉफ्ट कोपायलटने म्हटले आहे. हे सर्व बघता भारत अंतिम सामना जिंकू शकेल असे भाकीत कोपायलटने वर्तवले आहे.