Download App

IND vs PAK: पाकिस्तान समोर 267 धावांचे आव्हान, इशान-हार्दिकने ठोकले अर्धशतक

  • Written By: Last Updated:

IND vs PAK: भारतीय संघ 48.5 षटकांत सर्वबाद 266 धावांवर आटोपला. भारताकडून इशान किशनने 82 धावांची तर हार्दिक पांड्याने 87 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. शेवटी जसप्रीत बुमराहनेही 16 धावांचे योगदान दिले. पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी सर्व 10 विकेट घेतल्या. शाहीन आफ्रिदीने 4 बळी घेतले. तर नसीम शाह आणि हरिस रौफ यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.

या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिली 4 षटके रोहित आणि गिलच्या जोडीने सावध खेळ करत धावसंख्या 15 धावांपर्यंत नेली. यानंतर पावसामुळे सुमारे 20 मिनिटे खेळ थांबवावा लागला. सामना पुन्हा सुरू झाल्याने भारतीय संघाला कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या रूपाने दोन मोठे धक्के बसले.

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने त्याच्या शानदार इनस्विंग बॉलवर रोहित शर्माला बोल्ड करून भारताला पहिला धक्का दिला. यानंतर आफ्रिदीने विराट कोहलीला बोल्ड केले आणि 27 च्या स्कोअरवर 2 गडी बाद केले. यानंतर फलंदाजीला आलेल्या श्रेयस अय्यरने येताच धावा काढण्याचा प्रयत्न केला, मात्र वैयक्तिक 14 धावांवर तो हरिस रौफचा बळी ठरला. 66 धावांवर शुबमन गिलच्या रूपाने टीम इंडियाला चौथा धक्का बसल्यानंतर पाकिस्तानी गोलंदाजांचे दडपण स्पष्टपणे दिसत होते.

Ahmednagar Crime : महसूलच्या अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला; मध्यप्रदेशातून चौघे ताब्यात

भारतीय संघाच्या अव्वल फळीतील फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीनंतर इशान किशन डाव सांभाळत संकटमोचकाची भूमिका बजावली. इशान किशनने एकदिवसीय क्रिकेटमध्‍ये सलग चौथे अर्धशतक पूर्ण केले. हार्दिक पांड्यासोबत धावसंख्‍या पुढे नेली. ईशानचे वनडे कारकिर्दीतील हे 7 वे अर्धशतक आहे. ईशान फलंदाजीला आला तेव्हा टीम इंडियाने 48 धावांवर 3 विकेट गमावल्या होत्या. या सामन्यात इशान पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे.

ईशान किशन आणि हार्दिक पंड्याने 66 धावांवर 4 विकेट गमावलेल्या भारतीय संघाचा डाव सांभाळला. दोघांनी मिळून धावांचा वेग वेगवान ठेवला तर धावसंख्या लवकरच शंभरी पार केली. ईशानने वनडेतील सलग चौथे अर्धशतक पूर्ण केले. हार्दिक पांड्यानेही पाकिस्तानी गोलंदाजांवर हल्लाबोल करताना इशान किशनला चांगली साथ दिली. दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी 138 धावांची भागीदारी पाहायला मिळाली. या सामन्यात इशान किशन 82 धावांची खेळी करत हरिस रौफचा बळी ठरला.

Ahmednagar : सावेडी बसस्थानक कात टाकणार; पुनर्बांधणीसाठी पाच कोटींचा निधी मंजूर

इशान किशन बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्याला रवींद्र जडेजाची साथ मिळाली. दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी 35 धावांची भागीदारी पाहायला मिळाली. या सामन्यात हार्दिक शतक पूर्ण करण्यात यशस्वी होईल अशी सर्वांनाच अपेक्षा होती, पण 87 च्या वैयक्तिक धावसंख्येवर शाहीन आफ्रिदीने हार्दिकला आपला बळी बनवून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर रवींद्र जडेजाही 14 धावा करून बाद झाला.

शार्दुल ठाकूरला फलंदाजीत विशेष कामगिरी दाखवता आली नाही आणि तो 3 धावा करून बाद झाला. जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांच्यात 9व्या विकेटसाठी 19 धावांची भागीदारी पाहायला मिळाली. बुमराहने या सामन्यात 14 चेंडूत 16 धावांची खेळी केली. या सामन्यात भारतीय संघाचा डाव 48.5 षटकात 266 धावांवर आटोपला. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने 4 तर हरिस रौफ आणि नसीम शाहने 3-3 विकेट घेतल्या.

Tags

follow us