Download App

IND vs PAK : कोलंबोमधून चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, सामना पुन्हा सुरू होणार

  • Written By: Last Updated:

IND vs PAK : रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. आज दुपारी देखील पाऊस सुरु होता. त्यामुले सामना वेळेवर सुरु झाला नाही.आता कोलंबोमधून चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी येत आहे. पाऊस थांबला आहे. सामना 4.40 मिनिंटीनी सुरू होणार आहे. सध्या षटकांमध्ये कोणतीही कपात केलेली नाही.

भारतीय संघ 24.1 षटकांत 2 बाद 147 धावांवर खेळण्यास सुरुवात करणार आहे. सध्या टीम इंडियासाठी केएल राहुल आणि विराट कोहली क्रीजवर आहेत. कोलंबोमधील आज आकाश ढगाळ राहील, असे मानले जात आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे. आतापर्यंत झालेल्या 24 षटकांत भारतीय फलंदाजांचे वर्चस्व दिसून आले आहे. सुरुवातीच्या वीस षटकात रोहित आणि शुभमनने पाकिस्तानी गोलंदाजांची चांगली धुलाई केली होती. दोघे बाद झाल्यावर क्रीजवर आलेले राहुल आणि विराट देखील सहज खेळताना दिसून येत होते.

Photos : रेड कार्पेट ते कॅज्युअल डे आऊटपर्यंत रिताभरीचे फॅशनेबल लूक!

टीम इंडियासमोर पाकिस्तानी वेगवान गोलंदाजांचे आव्हान
शाहीन आफ्रिदीशिवाय पाकिस्तानकडे मोहम्मद नसीम आणि हरिस रौफसारखे वेगवान गोलंदाज आहेत. तसेच फहीम अश्रफ चांगल्या गतीने गोलंदाजी करू शकतो. त्यामुळे भारतीय फलंदाजांना राखीव दिवशी धावा करणे सोपे जाणार नाही. भारतीय चाहत्यांच्या नजरा विराट कोहलीवर असतील. आज दिवसभर कोलंबोमध्ये हवामानाची स्थिती कशी राहते हे महत्वाचे असेल. याशिवाय पाकिस्तानी वेगवान गोलंदाज भारतीय फलंदाजांसमोर कशी गोलंदाजी करतात? हे पाहणे मनोरंजक असणार आहे.

Ira Khan: ‘आत्महत्येचा विचार…’, आमिरच्या लेकीचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांचे वर्चस्व
या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. भारतासाठी रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी 16.4 षटकांत 121 धावांची भागीदारी केली. रोहित शर्माने 49 चेंडूंत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 56 धावा केल्या. शाहीन आफ्रिदीच्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी शुभमन गिलने 52 चेंडूत 58 धावा केल्या होत्या.सामना थांबला तेव्हा केएल राहुल आणि विराट कोहली क्रीजवर होते.

Tags

follow us