Download App

IND vs PAK LIVE Score ; रोहित-शुभमनची अर्धशतकं, पावसामुळे खेळ थांबला

IND vs PAK : पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियामध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. बुमराह आणि राहुलचे पुनरागमन झाले आहे. श्रेयस अय्यर आणि शामीला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे.

या सामन्यासाठी पाकिस्तानने शनिवारीच आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली होती. बाबर आझमने प्लेइंग इलेव्हनमध्ये चार वेगवान गोलंदाजांना स्थान दिले आहे.

Asia Cup 2023 : थरारक सामन्यात श्रीलंकेने मारली बाजी; बांग्लादेश आशिया कपमधून आऊट

श्रेयस अय्यर दुखापतीमुळे खेळत नाही
नाणेफेकीच्या वेळी भारतीय कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, श्रेयस अय्यरला पाठदुखी आहे आणि त्यामुळे तो पाकिस्तानविरुद्ध खेळत नाही. अय्यरच्या जागी केएल राहुल संघात परतला आहे.

भारताचे प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर.

पाकिस्तानचे प्लेइंग इलेव्हन : फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ.

Tags

follow us