IND vs PAK : विश्वचषक स्पर्धेतील सर्वाधिक (World Cup 2023) थरारक सामना म्हणजेच भारत विरुद्ध पाकिस्तानच्या (IND vs PAK) सामन्याला सुरुवात झाली आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून टीम इंडियाने (Team India) गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यावेळी भारतीय संघाला गुडन्यूज मिळाली. संघातील धडाकेबाज फलंदाज शुभमन गिल तंदुरुस्त होऊन संघात परतला आहे. त्यामुळे टीम इंडियाची फलंदाजी अधिक मजबूत झाली आहे. या सामन्यात भारताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तान संघाच्या फलंदाजीला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानचे सलामीचे फलंदाज मैदानात आहेत. 7 ओव्हरमध्ये पाकिस्तान संघाने वेगवान खेळ करत बिनबाद 37 रन केले आहेत.
आतापर्यंतच्या विश्वचषक स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामन्यांचा इतिहास पाहिला तर दोन्ही संघ सात वेळा आमनेसामने आले आहेत. या सातही सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली आहे. त्यानंतर आता हा आठवा सामना होत आहे. या विश्वचषकात दोन्ही संघानी पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. आता हा तिसरा सामना होत आहे. हा सामना जिंकण्याच्या इराद्यानेच भारताचा संघ मैदानात उतरला आहे.
या सामन्यात टीम इंडियाची फलंदाजी आणखी मजबूत झाली आहे. भारताचा सलामीचा फलंदाज शुभमन गिल परतला आहे. पहिल्या दोन सामन्यात गिल खेळू शकला नव्हता. डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे त्याला पहिल्या दोन सामन्यात खेळता आले नव्हते. आता मात्र गिल पूर्णपणे तंदुरुस्त होऊन मैदानात परतला आहे. त्याच्या पुनरागमनाने भारतीय संघाची फलंदाजीची मोठी काळजी मिटली आहे.
या स्पर्धेतील भारताचा हा तिसरा सामना आहे. आतापर्यंतच्या दोन सामन्यात विराट कोहलीने दमदार कामगिरी केली. पहिल्या दोन सामन्यात त्याने अर्धशतकी कामगिरी केली. या दोन सामन्यात त्याने एकूण 140 रन केले. त्यामुळ विराट सध्या फॉर्मात दिसत आहे. त्याची कामगिरी अशीच कायम राहिली तर भारतासाठी ही मोठी जमेची बाजू ठरेल. आता पाकिस्तानच्या विरोधात त्याची कामगिरी कशी राहिले हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
World cup 2023 : भारत-पाक सामन्यापूर्वी शुभमन गिल ठरला ‘प्लेअर ऑफ द मंथ’
भारत – रोहित शर्मा (कप्तान), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, सिराज, जसप्रीत बुमराह
पाकिस्तान – बाबर आझम (कप्तान), अब्दुल्ला शफीक, इमाम उल हक, रिजवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, नवाज, शादाब खान, हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ.