भारतीय संघाचा ओपनर इशान किशन याने केलेल्या तोडफोड खेळीच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत पाकिस्तानचा धुव्वा उडवत विजय मिळवला आहे. 27 व्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानसमोर 176 धावांचं आव्हान ठेवलं होतं. यामध्ये पाकिस्तानला भारतीय संघाने 100 रन होण्याच्या आतचं गुंडाळलं आहे.
टीम इंडियाची टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील 175 ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. टीम इंडियाने यासह स्वत:चाच रेकॉर्ड ब्रेक केला. टीम इंडियाने याआधी 2022 साली पाकिस्तान विरुद्ध 6 विकेट्स गमावून 160 धावा केल्या होत्या. पाकिस्तानला मोहम्मद नवाजच्या रुपाने सहावा धक्का बसला तेव्हाच पाकिस्तानच्या हातून सामना गेल्याचं समोर आलं हात.
ईशान किशनची वादळी खेळी
भारताने 20 षटकांत सात गडी बाद 175 धावा केल्या. भारताकडून ईशान किशनने अर्धशतक झळकावले. विशेष म्हणजे, या सामन्यात पाकिस्तानने फिरकी गोलंदाजांनी भारताविरुद्ध 18 षटके टाकली. भारताकडून ईशानने 40 चेंडूत 10 चौकार आणि तीन षटकारांसह 77 धावा केल्या, तर कर्णधार सूर्यकुमार यादवने 29 चेंडूत तीन चौकारांसह 32 धावा केल्या.
3️⃣/3️⃣ for #TeamIndia 💙
The #MenInBlue win by 6️⃣1️⃣ runs to qualify for Super 8! 💪
Scorecard ▶️ https://t.co/IgYYH0TeR9 #T20WorldCup pic.twitter.com/hFPqtYIERe
— BCCI (@BCCI) February 15, 2026
