Download App

टीम इंडियाला धक्का! चिवट फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेने सामना जिंकला

दक्षिण आफ्रिकेने दमदार वापसी करत दुसऱ्या टी 20 सामन्यात टीम इंडियाचा 3 विकेट राखून पराभव केला.

Ind vs SA 2nd T20 : दक्षिण आफ्रिकेने दमदार वापसी करत दुसऱ्या टी 20 सामन्यात टीम इंडियाचा 3 विकेट राखून पराभव केला. पोर्ट एलिझाबेथ येथे झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा (South Africa) पराभव केला. या सामन्यात दोन्ही संघांचे गोलंदाज प्रभावी ठरले. पण जेराल्ड कोएत्जीची शानदार अष्टपैलू कामगिरी आणि ट्रीस्टन स्टब्सच्या चिवट फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात भारतीय संघाचा (Team India) पराभव केला.

भारताने फक्त 124 धावा केल्यानंतरही सामना जिंकू असा विश्वास वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीने निर्माण झाला होता. कारण त्याने पाच विकेट्स घेतल्या होत्या. मात्र तरीही आफ्रिकेला विजयापासून रोखता आलं नाही. या विजया बरोबरच आफ्रिकेने (India vs South Africa) या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

या सामन्यात दोन्ही संघांच्या फलंदाजांना धावा करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत होता. पहिल्या टी 20 सामन्यात 202 धावा करणारा भारतीय संघ या सामन्यात पूर्ण 20 ओव्हर सुद्धा खेळू शकला नाही. 19.3 ओव्हरमध्ये फक्त 124 धावा करता आल्या. भारतीय संघाच्या टॉप ऑर्डरमधील फलंदाजी पूर्ण अपयशी ठरली.

टीम इंडियाचा पराक्रम! दक्षिण आफ्रिकेचा ६१ धावांनी पराभव; टी २० मध्ये सलग अकरावा विजय

मागील दोन सामन्यात शतक करणारा फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) या सामन्यात पुन्हा अशी कामगिरी करण्यात यशस्वी ठरला नाही. पहिल्याच ओव्हरमध्ये एकही रन न करता शून्यावर बाद झाला. सातत्याने अपयशी ठरत असलेला अभिषेक शर्मा या (Abhishek Sharma) सामन्यातही अपयशी ठरला. कर्णधार सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि रिंकू सिंहही (Rinku Singh) यावेळी काही करू शकले नाहीत. 45 धावा होईपर्यंत भारताच्या 4 विकेट पडल्या होत्या. नंतर अक्षर पटेलने (27 धावा, 21 चेंडू) वेगाने धावा केल्या. परंतु तो लवकरच रन आऊट झाला.

यानंतर हार्दिक पांड्याने मोर्चा (Hardik Pandya) सांभाळला. त्याने 45 चेंडूत 39 धावा केल्या. हार्दिकने मोठे फटके मारण्याचा मोह टाळला. एका बाजूने संथ गतीने धावा करत संघाला माफक आव्हानापर्यंत नेऊन ठेवले.

दक्षिण आफ्रिकेने सुरुवातीच्या दोन ओव्हरमध्ये वेगाने धावा केल्या. परंतु तिसऱ्या ओव्हरपासून विकेट पडण्यास सुरुवात झाली. 44 धावांपर्यंत 3 विकेट्स पडल्या होत्या. पाहता पाहता स्थिती आणखी खराब झाली. 66 धावा असताना सहा फलंदाज बाद झाले होते. वरुण चक्रवर्ती याच्या गोलंदाजीचे उत्तर आफ्रिकेच्या फलंदाजाकडे नव्हते. डेव्हिड मिलर (David Miller) तर पहिल्याच चेंडूवर बाद झाला.

आफ्रिकेच्या 86 धावा झालेल्या असताना सातवा फलंदाज बाद झाला. त्यामुळे भारत पुनरागमन करील अशी स्थिती निर्माण झालं होतं. दक्षिण आफ्रिकेला आता 26 चेंडूत 41 धावा पाहिजे होत्या. आफ्रिकेकडे फक्त तीन विकेट शिल्लक राहिल्या होत्या. यावेळी मात्र ट्रिस्टन स्टब्स मैदानावर होता. नंतर कोएत्जीने मोर्चा सांभाळला. नंतर भारतीय गोलंदाजांनी विकेट मिळवता आल्या नाहीत.

South Africa vs India : आफ्रिका 176 धावांवर ऑलआऊट; जिंकण्यासाठी भारतासमोर 79 धावांचे टार्गेट

follow us