IND Vs SA : दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरेल. दक्षिण आफ्रिकेने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. टीम इंडियाने दोन बदल केले आहेत.
सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड आज खेळत नाहीये. दुखापतीमुळे तो संघातून बाहेर गेला आहे. त्यांच्या जागी रजत पाटीदारला (Rajat Patidar) पदार्पणाची संधी मिळाली आहे. कुलदीप यादवलाही विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदर प्लेईंग इलेव्हनमध्ये आला आहे.
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन
संजू सॅमसन, साई सुदर्शन, रजत पाटीदार, तिलक वर्मा, केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.
अरबाज खान पुन्हा चढणार बोहल्यावर! मेकअप आर्टिस्टसोबत बांधणार लग्न गाठ
दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग इलेव्हन
दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग इलेव्हन- रीझा हेंड्रिक्स, टोनी डी झोर्झी, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लिझाद विल्यम्स, ब्यूरन हेंड्रिक्स.