Download App

IND vs SL Asia Cup Final: मोहम्मद सिराजकडून लंकाहरण ! एक षटकात चार बळी

  • Written By: Last Updated:

IND vs SL Asia Cup Final : आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने घातक गोलंदाजी केली. मोहम्मद सिराजसमोर लंकेच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. सिराजने तीन षटकांमध्ये लंकेचे तब्बल पाच फलंदाज बाद केले. त्यात एकाच षटकात चार गडी बाद केले. सिराजने अवघ्या पाच धावा दिल्या आहेत. तर जसप्रीत बुमराहने एक गडी बाद केला आहे. आतापर्यंत 7.2 षटकांत लंकेची सहा बाद 18 धावा अशी वाईट अवस्था झाली आहे.

पैसा लग्नावर नाही, शिक्षणावर खर्च करा; माझं लग्न फक्त ५० रुपयांत झालं; सुशीलकुमार शिंदेंनी सांगितला किस्सा

आशिया कपच्या अंतिम लढतीत श्रीलंकेने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. पाऊस सुरू झाल्याने सामना उशीरा सुरू झाला. लंकेच्या कर्णधाराचा निर्णय मोहम्मद सिराज व जसप्रीत बुमराहने चुकीचा ठरविला. बुमराहने सलीमीवीर कुसल परेराला पहिल्या षटकात बाद केले. त्यानंतर मोहम्मद सिराजने लंकेची पार दाणादाण उडविली. सिराजने एकाच षटकात तब्बल चार फलंदाज तंबूत परतविले. त्यानंतर आणखी एक बळी घेत लंकेला बॅकफूटवर टाकून सामन्यावर एकहाती वर्चस्वच निर्माण केले.

R Ashwin Birthday Special : आधी सलामीवीर, नंतर वेगवान गोलंदाज आणि शेवटी फिरकीत नाव कमावले

सिराजने कसा पराक्रम केला ?
सामन्याच्या दुसऱ्या षटकात गोलंदाजीला आलेल्या मोहम्मद सिराजने लंकेच्या फलंदाजांवर दबाव टाकला. या षटकात सिराजने एकही धाव दिली. सिराजने आपल्या दुसऱ्या षटकात लंकेच्या फलंदाजांना शरणागती पत्करायला लावली. या षटकात सिराजने चार फलंदाज बाद केले. त्यामुळे अवघ्या बारा धावांत लंकेचे पाच फलंदाज तंबूत परतले होते. तिसऱ्या षटकातही सिराजने कर्णधार दासुन शनाकाला बाद केले. तो शून्य धावेवर बाद झाला. सहा विकेट गेल्यानंतर मेंडिस आणि वेल्लालागे हे फलंदाजी करत आहेत.

Tags

follow us