IND vs SL; Dinesh Chandimal Injury : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल इंटरनॅशनल स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे. अनुभवी फलंदाज दिनेश चांदीमल क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला असून, त्याला पुढील वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आलं आहे. श्रीलंका क्रिकेटने याबाबत अधिकृत माहिती देताना चांदीमलच्या उजव्या खांद्याला आणि मानेच्या भागाला दुखापत झाल्याचं स्पष्ट केलं आहे.
चौकार वाचवण्याच्या प्रयत्नात दुखापत
भारताच्या दुसऱ्या डावात बाउंड्रीजवळ क्षेत्ररक्षण करत असताना चौकार रोखण्यासाठी चांदीमलने प्रयत्न केला. याचवेळी त्याला दुखापत झाली. मैदानातील फिजिओ आणि वैद्यकीय पथकाने लगेच त्याची तपासणी केली.
फडणवीस विरुद्ध तावडे ते यूपीची कमान; 7 वर्षांत तावडेंचा राजकीय प्रवास कसा बदलला?
दुखापतीची तीव्रता लक्षात घेऊन चांदीमलला मैदानाबाहेर नेण्यात आलं. त्यानंतर त्याच्या दुखापतीचं नेमकं स्वरूप समजण्यासाठी त्याला रुग्णालयात पाठवण्यात आलं.
स्कॅनच्या रिपोर्टनंतर चित्र स्पष्ट होणार
श्रीलंका क्रिकेटच्या माहितीनुसार चांदीमलच्या उजव्या खांद्याला तसेच मानेच्या भागाला दुखापत झाली आहे. मात्र, दुखापत नेमकी किती गंभीर आहे, हे स्कॅनचे रिपोर्ट आल्यानंतरच स्पष्ट होईल. त्यामुळे तो पुढील सामन्यांसाठी उपलब्ध असेल की नाही, याबाबत सध्या कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
चांदीमल श्रीलंकेच्या अनुभवी क्रिकेटपटूंपैकी एक असून तो कारकिर्दीतील 93 वा कसोटी सामना खेळत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत 6,500 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. भारताविरुद्धच्या पहिल्या डावात मात्र त्याला मोठी खेळी करता आली नाही. तो 16 चेंडूंत केवळ 4 धावा करून बाद झाला होता.
भारताला पहिल्या डावात 178 धावांची आघाडी
दरम्यान, गॉल कसोटीत भारतीय संघाने आपली स्थिती मजबूत केली आहे. भारताने पहिल्या डावात 462 धावांचा मोठा स्कोअर उभारला. त्यानंतर श्रीलंकेचा पहिला डाव 284 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे भारताला तब्बल 178 धावांची आघाडी मिळाली.
फडणवीसांना दिल्लीची आवड नसली तरी राष्ट्र साद घालतंय; संजय राऊतांचं मोठं विधान
भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात मात्र चांगली झाली नाही. डावाच्या पहिल्याच षटकात यशस्वी जयस्वाल बाद झाला. असिथा फर्नांडोने त्याला माघारी पाठवत भारताला खाते न उघडताच पहिला धक्का दिला.
राहुल-पडिक्कलने डाव सावरला
जयस्वाल बाद झाल्यानंतर केएल राहुल आणि देवदत्त पडिक्कल यांनी डावाची जबाबदारी स्वीकारली. दोघांनी संयमी फलंदाजी करत भारताला पुन्हा सामन्यात स्थिरावलं.
फडणवीसांना मंत्र्यांच्या निर्णयात हस्तक्षेपाचा अधिकार; मंत्र्यांच्या निर्णयांवर परिणाम होणार?
पहिल्या डावात राहुलने 82 धावांची उपयुक्त खेळी केली होती. तर पडिक्कलने शानदार फलंदाजी करत 167 धावांची मोठी खेळी साकारली होती. दुसऱ्या डावातही दोघांनी भारताची आघाडी वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भागीदारी केली. भारताने दुसऱ्या डावात 21.1 षटकांत 3 बाद 82 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताची एकूण आघाडी 260 धावांवर पोहोचली.
