Download App

आशिया कप महामुकाबला; कोण होणार चॅम्पियन? कोणाचे पारडे जड

Asia Cup Final 2023: भारत आणि श्रीलंका यांच्यात आशिया कपचा महामुकाबला उद्या (रविवारी) कोलंबोमध्ये होणार आहे. आशिया चषक स्पर्धेतील साखळी फेरीत आणि सुपर 4 मध्ये दोन्ही संघांनी चमकदार कामगिरी केली आहे. आशिया कप स्पर्धेत भारताने एकूण 5 सामने खेळले, त्यापैकी तीन जिंकले आणि एक पराभव पत्करावा लागला, तर एक सामना रद्द झाला.

तर श्रीलंकेच्या संघाने पाचपैकी चार सामने जिंकले आणि एक पराभव झाला. आशिया कप स्पर्धेत भारत आणि श्रीलंकेचे संघ 23 व्यांदा आमनेसामने येणार असून, भारत आठव्यांदा चॅम्पियन होणार का? तर दुसरीकडे श्रीलंकेच्या नजरा भारताच्या विक्रमाशी बरोबरी करण्याकडे असणार आहेत.

भारत आणि श्रीलंका यांच्यात एकूण 166 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारताने 97 सामने जिंकले आहेत, तर श्रीलंकेने 57 सामने जिंकले आहेत. रविवारीही दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. आशिया चषकाच्या अंतिम सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर दोन्ही संघ 8 वेळा आमनेसामने आले आहेत. भारताने 5 वेळा विजेतेपद पटकावले आहे, तर श्रीलंकेने तीन वेळा विजेतेपद पटकावले आहे.

Asia Cup 2023 : पावसामुळे उद्या सामना झाला नाही तर भारत की श्रीलंका कोण ठरणार चॅम्पियन?

भारतीय संघाने गेल्या पाच वर्षांत एकही विजेतेपद जिंकलेले नाही. त्यामुळे रविवारी आशिया कप ट्रॉफी आपल्या खात्यात समाविष्ट करण्याची रोहित आर्मीला चांगली संधी असेल. भारताने शेवटचे 2018 मध्ये क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये विजेतेपद पटकावले होते, जेव्हा रोहितच्या संघाने दुबईतील आशिया कपमध्ये बांगलादेशचा तीन गडी राखून पराभव केला होता.

भारत आणि श्रीलंका यांच्यात आर प्रेमदासा स्टेडियमवर 37 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी भारत 18 सामने जिंकले आहेत, तर श्रीलंकेने 16 सामने जिंकले आहेत. तीन सामन्यांचे निकाल जाहीर झाले नाहीत.

<a href=”https://letsupp.com/sports/world-cup-2023-pakistans-naseem-shah-out-of-world-cup-injured-against-india-88011.html”>विश्वचषकापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का, स्टार गोलंदाज संघातून बाहेर!

भारताने 2019 एकदिवसीय विश्वचषक आणि 2022 टी-20 विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. 2019 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलमध्ये न्यूझीलंडकडून आणि 2023 WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून हरले.

Tags

follow us