Asia Cup 2023 : पावसामुळे उद्या सामना झाला नाही तर भारत की श्रीलंका कोण ठरणार चॅम्पियन?

Asia Cup 2023 : पावसामुळे उद्या सामना झाला नाही तर भारत की श्रीलंका कोण ठरणार चॅम्पियन?

Asia Cup 2023 : आशिया कपमधील ( Asia Cup 2023) सुपर चारमधील शेवटच्या सामन्यात बांगलादेशने भारताचा सहा धावांनी पराभव केला आहे. त्यानंतर आता भारतीय क्रीकेट रसिकांच्या नजरा आशिया कपच्या अंतिम सामन्याकडे लागल्या आहेत. हा सामना भारत आणि श्रीलंकेमध्ये 17 सप्टेंबरला होणार आहे. मात्र या सामन्यावर देखील पावसाचं सावट आहे.

विश्वचषकापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का, स्टार गोलंदाज संघातून बाहेर!

श्रीलंकेतील कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर रविवारी 17 सप्टेंबरला पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे जर रविवारी 17 सप्टेंबरला प्रेमदासा स्टेडियमवर पाऊस झाला तर भारत आणि श्रीलंकेमध्ये होणाऱ्या सामन्याचं काय होणार? हा सामना रिझर्व्ह डे ला खेळवला जाणार आहे का? की यावेळी देखील अशिया कपचं विजेतेपद विभागून दिलं जाणार का? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

मुख्यमंत्र्यांनीच जरांगे पाटलांना उपोषणाला बसवलं; कॉंग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा

कोण-कोणत्या आहेत शक्यता?

रविवारी 17 सप्टेंबरला आशिया कप 2023 मधील अंतिम सामना भारत आणि श्रीलंकेमध्ये होणार आहे. दुपारी 3 वाजता हा सामना खेळवला जाणार आहे. मात्र हवामान विभागाने उद्या कोलंबोमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पावसाची 90 टक्के शक्यता आहे. त्यामुळे जर रविवारी 17 सप्टेंबरला प्रेमदासा स्टेडियमवर पाऊस झाला तर या सामन्यासाठी रिझर्व्ह डे देखील ठेवण्यात आला आहे. त्यामुळे हा सामना सोमवारी देखील होऊ शकतो.

दुसरीकडे हवामान विभागाने सोमवारी देखील कोलंबोमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तेव्हा पावसाची 70 टक्के शक्यता आहे. त्यामुळे सोमवारी देखील सामना होऊ शकला नाही. तर 20-20 ओव्हरचा सामना देखील खेळला जाऊ शकला नाही. तर भारत आणि श्रीलंकेमध्ये अशिया कपचं विजेतेपद विभागून दिलं जाऊ शकत. ज्याप्रमाणे 2002 मध्ये देखील भारत-श्रीलंका फायनलमध्ये पोहचले होते. पण तेव्हाही पावसामुळे सामना होऊ शकला नव्हता आणि भारत आणि श्रीलंकेमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद विभागून देण्यात आलं होतं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube