IND vs ZIM : भारताला मोठा धक्का, झिम्बाब्वेविरुद्ध खेळणार नाही ‘हा’ स्टार खेळाडू; जाणून घ्या कारण

IND vs ZIM : टी20 विश्वचषक 2026 च्या सुपर 8 च्या दुसर्‍या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टार खेळाडू अचानक घरी परतल्याने

IND Vs ZIM

IND Vs ZIM

IND vs ZIM : टी20 विश्वचषक 2026 च्या सुपर 8 च्या दुसर्‍या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टार खेळाडू अचानक घरी परतल्याने तो आता झिम्बाब्वेविरुद्ध 26 फेब्रुवारी रोजी होणार्‍या सामन्यात खेळणार नाही. भारतीय संघाला 26 फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे झिम्बाब्वेविरुद्ध (IND vs ZIM) करो या मरो सामना खेळायचा आहे मात्र त्यापूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, स्टार खेळाडू रिंकु सिंग घरी परतला आहे. रिंकुचे वडिलांची तब्येत बिघडल्याने रिंकु घरी परतला आहे. त्यामुळे तो झिम्बाब्वेविरुद्ध खेळताना दिसणार नाही.

रिंकू सिंगच्या वडिलांची तब्येत बिघडली

रिंकू सिंग (Rinku Singh) 24 फेब्रुवारी रोजी भारताच्या ट्रेनिंग सेशनमध्ये सहभागी झाला नव्हता.त्याचे वडील खानचंद सिंग यांची तब्येत बिघडल्याने तो घरी परतल्याची बातमी समोर आली. माहितीनुसार रिंकुचे वडील स्टेज 4 यकृताच्या कर्करोगाशी झुंजत आहे आणि सध्या ग्रेटर नोएडा येथील रुग्णालयात दाखल आहे.

वृषभ राशीसह ‘या’ राशींच्या लोकांना होणार व्यवसायात फायदा; जाणून घ्या आजचा दिवस सर्व 12राशींसाठी कसा राहणार ?

नेट सेशनमधून मिळालेले मोठे संकेत

भारताच्या व्यवस्थापनाला माहिती आहे की रिंकू सिंग झिम्बाब्वेविरुद्ध खेळू शकणार नाही. त्यामुळे त्यांनी बॅकअप प्लॅन तयार केला आहे. वृत्तानुसार, संजू सॅमसनने ट्रेनिंग सेशनदरम्यान बराच वेळ फलंदाजी केली.त्याने एक तास सराव केला.तो नेटमध्ये सर्वाधिक वेळ घालवणारा फलंदाज होता.सॅमसनने यापूर्वी खालच्या क्रमात फलंदाजी केली आहे आणि झिम्बाब्वेविरुद्ध हा अनुभव वापरू शकतो.

Exit mobile version