मोठी बातमी! टी20 विश्वचषक 2026 भारत पाकिस्तान सामना होणार

Ind Vs Pak 2026 : टी20 विश्वचषक  2026 मध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान सामना होणार असल्याची माहिती समोर आली आहे.  सुरुवातीला पाकिस्तानने

Ind Vs Pak 2026

Ind Vs Pak 2026

Ind Vs Pak 2026 : टी20 विश्वचषक  2026 मध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान सामना होणार असल्याची माहिती समोर आली आहे.  सुरुवातीला पाकिस्तानने भारताविरुद्ध खेळण्यास नकार दिला होता मात्र आता पाकिस्तान भारतासोबत खेळण्यास तयार झाला असून 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे भारत आणि पाकिस्तान दरम्यान सामना होणार आहे. आयसीसी आणि पीसीबी दरम्यान झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

पाकिस्तानने केली द्विपक्षीय मालिकेची मागणी

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, पीसीबीकडून भारताविरुद्धचा बहिष्कार मागे घेण्यासाठी अनेक मागण्या केल्या आहेत. पाकिस्तानला भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशसोबत द्विपक्षीय मालिका खेळायची आहे.

पीसीबीने तिन्ही देशांदरम्यान तिरंगी मालिका खेळण्याची मागणीही केली आहे. पाकिस्तानच्या किती मागण्या आयसीसीने पूर्ण केल्या आहेत हे अद्याप निश्चित झालेले नाही. आयसीसी भारतासोबत मालिकेची हमी देऊ शकत नाही, कारण सर्व अधिकार बीसीसीआयकडे आहेत.

Exit mobile version