विराट कोहलीचा नवा रेकॉर्ड; टॉप-5 दिग्गजांच्या यादीत समावेश

Virat Kohli Enters Top 5 Highest Run Scorers In International Cricket: भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने आपला 500 वा आंतरराष्ट्रीय सामना खूप खास बनवला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या त्रिनिदाद कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कोहली नाबाद ८७ धावांवर खेळत होता. या खेळीसह तो आता जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या टॉप-5 खेळाडूंच्या यादीत सामील झाला […]

Letsupp Image   2023 07 21T120856.633

Letsupp Image 2023 07 21T120856.633

Virat Kohli Enters Top 5 Highest Run Scorers In International Cricket: भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने आपला 500 वा आंतरराष्ट्रीय सामना खूप खास बनवला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या त्रिनिदाद कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कोहली नाबाद ८७ धावांवर खेळत होता. या खेळीसह तो आता जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या टॉप-5 खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. कोहलीच्या पुढे दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जॅक कॅलिस पहिल्या पाचव्या स्थानावर होता.

भारताविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चांगल्या सुरुवातीनंतर टीम इंडियाने 155 धावांवर 3 विकेट गमावल्या. इथून कोहलीने एका टोकापासून डाव सांभाळला आणि धावांचा वेग वेगवान ठेवण्याचे काम केले. यामध्ये त्याला रवींद्र जडेजाची साथ लाभली आणि दिवसअखेर दोघांमध्ये १०६ धावांची भागीदारी झाली. पहिल्या दिवशी भारताची धावसंख्या 4 गडी गमावून 288 धावा होती.

Manipur महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून कलाकारांनी व्यक्त केला संताप, ट्वीट करत म्हणाले…

विराट कोहलीने दिवसाच्या शेवटच्या सत्रात आपल्या डावातील 74वी धाव पूर्ण केली तेव्हा तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-5 खेळाडूंमध्ये सामील झाला. या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानावर आहे. तर कोहली आता पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. कोहलीच्या नावावर सध्या 25548 धावा आहेत. तर त्यांच्यासमोर सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा, रिकी पाँटिंग आणि महेला जयवर्धने आहेत.

विवेक अग्निहोत्री ‘The Kashmir Files Unreported’ ची घोषणा; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 500 वा सामना खेळणाऱ्या विराट कोहलीने पहिल्या दिवसाच्या खेळात अर्धशतक पूर्ण करताना आणखी एक विशेष कामगिरी केली. कोहली सोडून 500 वा सामना खेळणाऱ्या एकाही खेळाडूने अर्धशतक झळकावले नव्हते. त्याच वेळी, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात कोहली 2000 धावा पूर्ण करणारा भारताचा दुसरा खेळाडू बनला आहे.

Exit mobile version