विवेक अग्निहोत्री ‘The Kashmir Files Unreported’ ची घोषणा; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

विवेक अग्निहोत्री ‘The Kashmir Files Unreported’ ची घोषणा; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Vivek Agnihotri Tweet: विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या सिनेमाला गेल्या वर्षी देशातून चाहत्यांचे खूपच प्रेम मिळाले आहे. हा सिनेमा प्रदर्शित होऊन १ वर्ष पूर्ण झाले आहेत, तरी देखील सिनेमाची उत्कृष्ट फिल्मोग्राफी आणि पात्रांच्या भूमिकेचं मात्र मोठ्या प्रमाणात कौतुक होत असतं. या सिनेमात अनुपम खेर (Anupam Kher), मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार हे मुख्य भूमिकेत दिसून आले होते.

काहींनी या सिनेमाचे कौतुक केलं आहे, तर काहींनी यावर जोरदार टीका देखील केली होती. मोठ्या वादाच्या भोवऱ्यात हा सिनेमा त्यावेळी अडकल्याचे दिसून आले होते.  आता या सिनेमाचा पुढचा भाग चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. याची माहिती स्वत:दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या ट्विटरवरून माहिती दिली आहे. आता तुमच्यासमोर काश्मीर हिंदूंच्या नरसंहाराचे असभ्य सत्य येणार असल्याचे यावेळी सांगितले आहे.

ज्यावर फक्त एक शैतानच सवाल करू शकणार आहे. ‘रडायला तयार राहा’ असं म्हणत अग्निहोत्री यांनी सिनेमाचा एक छोटासा टीझर देखील आउट केला आहे. यामुळे चाहत्यांना आता मोठी अपेक्षा लागली आहे. या सिनेमात आता नेमकं काय दाखवणार आहेत.

‘द कश्मीर फाइल्स’ हा सिनेमा नव्वदच्या दशकामध्ये काश्मीर खोऱ्यातील पंडितांच्या हत्येच्या आणि अमानुष अत्याचारांच्या वर्णन केला आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ या सिनेमावर मोठ्या प्रमाणात टीकेची सोड सोडण्यात आली होती. परंतु तरी देखील मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. या सिनेमात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार आणि पल्ल्वी जोशी मुख्य भूमिकेत दिसून आले होते.

Manipur महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून कलाकारांनी व्यक्त केला संताप, ट्वीट करत म्हणाले…

या सिनेमात काश्मीर खोऱ्यातील पंडितांच्या हत्येच्या आणि अमानुष अत्याचारांच्या घटनांचे वर्णन करण्यात आल्याचे दिसले आहे. देशात या सिनेमाने २५२.९० कोटींची कमाई केली होती. या सिनेमाला ‘इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार’ सोहळ्यात ‘गोल्डन फिल्म’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हा सिनेमा हिंदी, तमिळ, तेलुगु आणि कन्नड या भाषेत देखील प्रदर्शित करण्यात आला होता. काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अमानुष छळाचे चित्रण करणारा हा सिनेमाला चाहत्यांनी त्यावेळी चांगलाच भावला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube