WI vs IND : भारत विरूद्ध वेस्ट इंडिज या टी-20 मालिकेमध्ये भारताला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. वेस्ट इंडिजने भारताचा या मालिकेत 3-2 असा पराभव केला. ही मालिका भारत हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वाखाली खेळत होता. वेस्ट इंडिजने शेवटच्या सामन्यात भारताचा 8 विकेटने पराभव केला. वेस्ट इंडिजने 17 वर्षांनंतर ही टी-20 मालिका जिंकली आहे. ( India Lost T20 Series Against West Indies After 17 years )
14 ऑगस्टला पाकिस्तान त्यांचा स्वातंत्र्य दिन का साजरा करतो?
या मालिकेतील शेवटचा सामना रविवारी फ्लोरिडामध्ये खेळला गेला. हा निर्णायक सामना होता कारण पहिल्या चार सामन्यांपर्यंत मालिका 2-2 अशी बरोबरीत होती. मात्र वेस्ट इंडिजने शेवटच्या सामन्यात भारताचा 8 विकेटने पराभव केला आणि मालिका आपल्या नावे केली आहे. मात्र हा पराभव का झाला? याची कारण सांगितली जात आहेत?
गंमतभेटींसाठी महाराष्ट्र म्हणजे गंमतजंमत नाही; सामनातून टीकास्त्र
भारताच्या पराभवाची कारणे...
टी-20 मालिकेमध्ये भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. याचं पहिलं कारण सांगितलं जात ते म्हणजे भारताकडून फलंदाजीची खराब सुरूवात करण्यात आली. चौथ्या सामन्यातील यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांची 165 धावांची भागीदारी सोडता उर्वरित चार सामन्यांत सलामीवीरांना चांगली सुरूवात करण्यात अपयश आले.
कर्णधार हार्दिक पांड्या संपूर्ण मालिकेत फलंदाजी आणि गोलंदाजी करण्यात तितका यशस्वी झाला नाही. त्याने केवळ 4 डावात 110 च्या स्ट्राईकने केवळ 77 धावा केल्या तर 5 डावांत 15 षटकांत केवळ 4 विकेट घेतल्या. तर संजू सॅमसनने देखील संधीचा फायदा केला नाही. तो 3 डावांत केवळ 32 धावा करू शकला. त्याचबरोबर युजवेंद्र चहल आणि अक्षर पटेल यांचे या मालिकेत विशेष योगदान नव्हते. त्यांनी फारशा विकेटही घेतल्या नाही.