IND vs SA 2nd ODI : भारताने वनडेमध्ये सलग 20 व्यांदा गमावलं टॉस; आज मालिका जिंकणार? जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

IND vs SA 2nd ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज रायपूर येथील

IND Vs SA 2nd ODI

IND Vs SA 2nd ODI

IND vs SA 2nd ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने कोणताही बदल केलेला नाही तर दक्षिण आफ्रिकेने या सामन्यासाठी संघात तीन बदल केले आहे.

या मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताने शानदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा 17 धावांनी (IND vs SA) पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. तर आता आजचा सामना जिंकून या मालिकेत अजिंक्य आघाडी घेण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे. तर दुसरीकडे भारताने या सामन्यात देखील टॉस गमावला आहे. भारताने आता एकदिवसीय सामन्यांमध्ये सलग 20 व्यांदा टॉस गमावला आहे. एकदिवसीय सामन्यात भारताने शेवटाचा टॉस न्युझीलंडविरुद्ध विश्वचषक 2023 च्या सेमीफायनलमध्ये जिंकला होता.

या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेने संघात तीन बदल केले आहे. कर्णधार टेम्बा बावुमा आणि फिरकी गोलंदाज केशव महाराज यांची संघात एन्ट्री झाली आहे. रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह स्टेडियमवर हा दुसरा सामना असेल. पहिला सामना जानेवारी 2023 मध्ये खेळला गेला होता, जेव्हा टीम इंडियाच्या वेगवान आक्रमणाने या उपयुक्त खेळपट्टीवर न्यूझीलंडला 108 धावांत गुंडाळले होते आणि 30 षटके शिल्लक असताना आठ विकेटने सामना जिंकला होता.

एकदिवसीय सामन्यांचा विक्रम

भारत आणि दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत 95 एकदिवसीय सामने खेळले आहेत. भारताने 41 सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेने 51 सामने जिंकले आहेत. तीन सामने अनिर्णित राहिले. दोन्ही संघ भारतीय भूमीवर 33 वेळा एकमेकांशी भिडले आहेत. भारताने 19 वेळा आणि दक्षिण आफ्रिकेने 14 वेळा विजय मिळवला आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे प्लेइंग इलेव्हन

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन) :

क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), एडेन मार्कराम, टेम्बा बावुमा (कर्णधार), मॅथ्यू ब्रीट्झके, टोनी डी झोर्झी, देवाल्ड ब्रेव्हिस, मार्को जानसेन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी.

रुपया घसरला! डॉलरच्या तुलनेत विक्रमी नीचांकी पातळीवर; एका डॉलरची किंमत 90.02 रुपये

भारत (प्लेइंग इलेव्हन)

यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा.

Exit mobile version