Download App

कसोटी क्रमवारीत भारताचा दबदबा; पाहा कोण कितव्या स्थानावर

ICC Test Rankings : पुन्हा एकदा भारतीय संघ कसोटीत सर्वोत्तम ठरला आहे. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत (ICC Test Rankings) पहिल्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाला खाली खेचत टीम इंडियाने पहिले स्थान पटकावले आहे. 3 हजार 031 गुणांसह, टीम इंडिया आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाचे 25 सामन्यांत 3,031 गुण झाले आहेत. त्याच वेळी, संघाचे रेटिंग 121 आहे.

टीम इंडियानंतर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांचे 23 सामन्यांत 2,679 गुण आहेत. त्याच वेळी, या संघाचे रेटिंग 116 आहे. यानंतर इंग्लंड तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्यांनी 36 सामन्यांत 4,103 गुण मिळवले आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल मॅच टेस्ट रँकिंगमधील टॉप-2 टीम्समध्ये खेळली जाईल म्हणजेच हा मॅच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात असेल. 7 जूनपासून ओव्हल मैदानावर अंतिम सामना खेळवला जाईल. वर्ल्ड टेस्ट फायनलसाठी (WTC Final 2023) दोन्ही संघांनी आपला संघ तयार केला आहे.

WTC 2023 फायनलसाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनादकट.

WTC 2023 फायनलसाठी ऑस्ट्रेलिया संघ:
पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर

Tags

follow us