Download App

IND vs AUS 1st Test Day 2 : दुसऱ्या दिवशीच्या सुरूवातीलाच भारताला दोन धक्के, पुजाराही परतला

IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याला नागपुरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन क्रिकेट स्टेडियमवर सुरुवात झाली. नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) दृष्टीने ही मालिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. (Team India) एक रंगतदार स्पर्धा पाहायला मिळू शकते. भारताकडून आज सूर्यकुमार यादव आणि केएस भरत या दोघांना पदार्पणाची संधी मिळाली. याशिवाय अक्षर, (india vs australia live score) अश्विन आणि जाडेजा हे फिरकीपटू असून केएल राहुलही संघात आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आज भारत आपला पहिला डाव 1 बाद 77 धावांपासून पुढे खेळण्यास सुरूवात करणार आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा काल दिवस अखेर 56 धावा करून नाबाद होता. आज तो आपली ही अर्धशतकी खेळी मोठ्या खेळीत रूपांतरित करण्यासाठी प्रयत्नशील असेल. त्याला साथ देण्यासाठी नाईट वॉचमन म्हणून रविचंद्रन अश्विन खेळपट्टीवर आला आहे. त्याने अजून खाते उघडले नसले तरी त्याच्याकडूनही मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.

पहिल्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 177 धावांमध्ये संपवला होता. त्यानंतर दिवसअखेर 1 बाद 77 धावा केल्या होत्या. भारत पहिल्या डावात अजून 100 धावांनी पिछाडीवर आहे.

मर्फीने दिले भारताला दोन धक्के
ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू टॉड मर्फीने भारताला दोन धक्के दिले. त्याने 23 धावा करून सेट होऊ पाहणाऱ्या आर अश्विनला बाद केले. त्यानंतर चेतेश्वर पुजाराला देखली 6 धावांवर बाद करत भारताला तिसरा धक्का दिला.

भारताची शंभरी पार
पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने आपला डाव 1 बाद 77 धावांपासून पुढे खेळण्यास सुरूवात केली. काल शुन्यावर खेळत असलेल्या अश्विनने आज आपले खाते उघडले. त्याने रोहित शर्माच्या साथीने भागीदारी रचण्यास सुरूवात केली. या दोघांनी भारताचे शतक धावफलकावर लावले.

Tags

follow us