Download App

IND vs AUS 1st Test : युवा फलंदाज मैदानातून ते थेट रुग्णालयात, नक्की काय झालं ?

IND vs Aus : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत पहिला सामना नागपूरमध्ये सुरु आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा सर्व संघ १७७ या धावसंख्येवर सर्वबाद झाला होता. या सामन्याचा दुसरा दिवस सुरु १७७ धावांचा टप्पा ओलांडून ४५ हून जास्त धावांची आघाडी घेतली. (IND vs Aus 1st Test ) भारताची स्थिती भक्कम होत असताना कांगारुंना सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मोठा फटका बसला. ऑस्ट्रेलियन फलंदाज मॅट रेनशॉ (Matt Renshaw) वॉर्मअप करताना जबर जखमी झाला. (India vs Australia) यामुळे दुसऱ्या दिवशी मैदानात खेळण्याऐवजी त्याची रवानगी थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मॅट रेनशॉच्या जागी एश्टन एगर मैदानात क्षेत्ररक्षण करत आहे. यामुळे आता सामन्याच्या उर्वरित दिवसात मैदानात उतरणार की नाही याविषयी शंका होती. पहिल्या डावात फलंदाजी करत असताना रेनशॉ भोपळाही फोडू शकला नाही. रविंद्र जडेजाने त्याला थेट तंबूचा रस्ता दाखवला होता. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याविषयी माहिती दिली आहे की, “रेनशॉ दुसऱ्या दिवशीच्या खेळ सुरु होण्याअगोदर करत असलेल्या सरावाच्या दरम्यान जखमी झाला. त्याच्या गुडघ्याला जबर दुखापत झाली. त्यामुळे त्याला वीसीए स्टेडियममधून थेट स्कॅन करण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

त्या ऐवजी मैदानात एश्टन एगर क्षेत्ररक्षण करत आहे. ऑस्ट्रेलियन संघातील काही खेळाडू दुखापतग्रस्त असल्याने संघाची चिंता वाढली. अष्टपैलू कॅमरन ग्रीन आणि मिचेल स्टार्क बोटाच्या दुखापतीमुळे नागपूर कसोटीला मुकले आहेत. तर दुसरीकडे जोश हेझलवूडदेखील दुखापतग्रस्त असल्याने चिंता वाढली. आता यामध्ये मॅट रेनशॉ याची भर पडली.

ऑस्ट्रेलियाकडून कोणताही खेळाडू खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. पण दुसऱ्या षटकातच ऑस्ट्रेलियाला उस्मान ख्वाजाच्या रुपाने पहिला धक्का बसला. मोहम्मद सिराजनं त्याला अवघ्या एका धावेवर पायचीत केलं. यानंतर लगेचच तिसऱ्या षटकात पहिल्या चेंडूवर मोहम्मद सिराजनं डेविड वॉर्नरला बाद केलं होत. ऑस्ट्रेलियन संघ दबावात असताना मार्सन लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ जोडीनं डावरलं. तिसऱ्या गड्याकरिता ८२ धावांची भागीदारी केली. मात्र केएस भारतनं चपळतेने केलेल्या स्टंपिंग करत ही जोडी फोडली. यामुळे आलेला मॅट रेनशॉ भोपळाही फोडू शकला नाही. जडेजाच्या गोलंदाजीवर पायचीत झाला.

Tags

follow us