Download App

IND vs AUS 3rd Test : आजपासून इंदूरमध्ये रंगणार भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरी टेस्ट मॅच

इंदूर : भारत (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात सध्या बॉर्डर गावस्कर मालिका सुरु आहे. 4 कसोटी मालिकेतील आज तिसरा सामना इंदूर येथे खेळवला जाणार आहे. पहिला आणि दुसरा सामना भारताने जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. तिसरी कसोटी जिंकून भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित करेल. त्यामुळे आजपासून सुरु होणार सामना भारतासाठी महत्त्वाचा आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा तिसरा कसोटी सामना (India vs Australia 3rd Test) आजपासून सुरु होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सामना खेळवला जाईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे. इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर (Holkar Cricket Stadium) कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं.

Shinde Vs Thackeray : सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा भेदक प्रश्न : एकनाथ शिंदे यांची झोप उडू शकते…

या सामन्यात भारत अधिक बदल करण्याची शक्यता नाही, कारण सध्या भारताचा खेळ चांगला होत आहे. मात्र सलामीवीर केएल राहुल (KL Rahul) सतत फ्लॉप कामगिरी करत असल्याने त्याला वगळलं जाऊ शकतं. नुकत्याच झालेल्या मर्यादीत षटकांच्या सामन्यात तुफान फॉर्म दाखवलेल्या शुभमन गिलला (Shubhman Gill) सलामीची संधी दिली जाऊ शकते. केएल राहुलने मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये केवळ 12.67 च्या सरासरीने 38 धावा केल्या आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 104 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 32 सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने 43 सामने जिंकले आहेत. याशिवाय 28 सामने ड्रॉ झाले असून एक सामना बरोबरीत सुटला आहे.

Tags

follow us