Champions Trophy 2025 India vs Pakistan : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत (Champions Trophy 2025) आणि पाकिस्तान यांच्यातील हायहोल्टेज (India vs Pakistan) उद्या (रविवार) दुबईत होत आहे. या सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ पूर्णपणे तयार आहे. कारण पहिल्या सामन्यात पराभव झाला आहे. स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर भारताविरूद्धचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागणार आहे. त्यामुळे या सामन्यासाठी पाकिस्तानी संघाने स्पेशल तयारी केली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीत पहिला सामना पाकिस्तानने गमावला आहे. आता उद्या टीम इंडियाविरुद्ध दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर दुसरा सामना होणार आहे. भारताने साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात बांग्लादेशचा पराभव केला आहे. आता या सामन्यासाठी दोन्ही संघांनी खास तयारी केली आहे. दरम्यान, उद्या दुपारी 2.30 वाजल्यापासून या सामन्यास सुरुवात होणार आहे.
भारत-पाकिस्तान सान्याबद्दल IIT बाबांचं धक्कादायक भाकित; चाहत्यांमध्ये उसळली संतापाची लाट
पाकिस्तानसाठी उद्याचा सामना करो या मरोचाच आहे. कारण या सामन्यात जर पाकिस्तानचा पराभव झाला तर येथेच त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. सेमी फायनलमध्ये प्रवेश करणे पाकिस्तानसाठी अत्यंत कठीण होणार आहे. न्यूझीलंड विरोधात पहिल्या सामन्यात पाकिस्तानला 60 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर भारताविरूद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानी खेळाडूंनी खास तयारी केली आहे. पाकिस्तानी टीमने शुक्रवारी एक्सटेंडेड प्रॅक्टिस सेशन आयोजित केले होते.
पाकिस्तानी संघाने दुबईतील क्रिकेट स्टेडियममध्ये तीन तास सराव केला. यात कप्तान वगळता सर्व खेळाडूंनी वीस मिनिटांच्या एक्सटेंडेड सेशनमध्ये भाग घेतला. वेगवान गोलंदाज शाहीन शाह अफरीदी आणि हारिस रउफ यांच्याकडून पाकिस्तान संघाला जास्त अपेक्षा आहेत. पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक आकिब जावेद आणि कर्णधार रिजवानने खेळाडूंशी दीर्घकाळ चर्चा केली.
दरम्यान, उद्या रविवारी होणाऱ्या महामुकाबल्याच्या आधी महाकुंभमधून ‘आयआयटी बाबा’ या नावाने प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अभय सिंहने या सामन्याबद्दल एक मोठी भविष्यवाणी केली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या हायव्होल्टेज सामन्याबाबत बाबाने केलेली ही मोठी भविष्यवाणी भारतीय चाहत्यांना धक्का देणारी आहे. त्याच्या या अंदाजाने भारतीय ते त्यांच्यावर संतापले. महाकुंभ मेळा 2025 मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या ‘IIT बाबा’ने एका व्हिडीओमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याबाबत मोठा दावा केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार , आगामी सामन्यात भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध जिंकू शकणार नाही.
भारत-पाकिस्तान सान्याबद्दल IIT बाबांचं धक्कादायक भाकित; चाहत्यांमध्ये उसळली संतापाची लाट