Download App

IND W vs PAK W: T20 : आज रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामना

  • Written By: Last Updated:

मुंबई : दक्षिण आफ्रिकेत महिला टी-20 विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. आज रविवार दिवशी भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात हाय व्होल्टेज सामना होणार आहे. दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान भारत व पाकिस्तान सामना म्हंटले की क्रिकेटप्रेमींना कमालीची उत्सुकता असते. त्यामुळे आजचा सामना देखील रंगतदार होईल अशी आशा आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सलामीवीर शेफाली वर्मावर मोठी जबाबदारी असेल. शेफाली आयसीसी क्रमवारीत आठव्या स्थानावर असून ती उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. शेफालीने अलीकडेच दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर झालेल्या 19 वर्षांखालील महिला विश्वचषक स्पर्धेत चमकदार खेळ दाखवला.

कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांच्याकडूनही पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दमदार खेळण्याची अपेक्षा आहे. टीम इंडियाचा सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणजे अष्टपैलू दीप्ती शर्मा, जिची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. भारत आणि पाकिस्तान संघ शेवटच्या वेळी आमनेसामने आले होते, त्या सामन्यात दीप्ती शर्माने तीन विकेट घेतल्या होत्या.

वेगवान गोलंदाज शिखा पांडेचे प्रदीर्घ कालावधीनंतर संघात पुनरागमन झाले असून ती पाकिस्तानविरुद्ध गेम चेंजर ठरू शकते. वेगवान गोलंदाज रेणुका सिंग आणि फिरकीपटू जेश्‍वरी गायकवाड यांच्याकडेही चाहत्यांची नजर असेल.

भारतीय महिला संघ: हरमनप्रीत कौर (क), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया (विकेटकीप), रिचा घोष (विकेटकीप), जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका सिंग, पूजा वस्त्राकर, अंजली सरवाणी, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे.

पाकिस्तान महिला संघ: बिस्मा मारूफ (क), आयमान अन्वर, आलिया रियाझ, आयशा नसीम, ​​सदफ शमास, फातिमा सना, जावेरिया खान, मुनीबा अली (विकेटकीपर), नशरा संधू, निदा दार, ओमेमा सोहेल, सादिया इक्बाल, सिद्रा अमीन , सिद्रा नवाज (यष्टीरक्षक), तुबा हसन.

वेळ : भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 पासून खेळला जाईल

Tags

follow us