Download App

IND vs WI : सूर्यकुमार यादवऐवजी संजू सॅमसनला संधी दिली पाहिजे, कारण….

  • Written By: Last Updated:

Surya and Sanju : 2023 च्या वनडे विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय संघाकडे जास्त वेळ नाही, अशावेळी टीम इंडियाला आपल्या सर्व उणीवा दूर करायच्या आहेत. सूर्यकुमार यादवचा फॉर्म सध्या टीम इंडियासाठी मोठी समस्या आहे. मधल्या फळीत खेळत असलेल्या सूर्याची बॅट गेल्या काही डावांत शांत दिसली. टीम इंडियाकडे त्याचा पर्याय म्हणून संजू सॅमसन आहे, ज्याची गेल्या 10 डावांमध्ये फलंदाजीतील सरासरी खूपच प्रभावी आहे.(india vs west indies why should sanju samson be given a chance instead of suryakumar yadav look at both player record in last 10 innings)

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात सूर्यकुमार यादव फक्त 19 धावा करू शकला. याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या वनडे मालिकेत खेळल्या गेलेल्या तीनही सामन्यांमध्ये त्याला खातेही उघडता आले नव्हते. सूर्याच्या शेवटच्या 10 एकदिवसीय डावातील फलंदाजीतील सर्वोच्च धावसंख्या नाबाद 34 होती. सूर्यकुमारचीही गेल्या 10 डावांमध्ये सरासरी 12 इतकीच आहे.

दुसरीकडे, संजू सॅमसनचा शेवटच्या 10 एकदिवसीय डावातील विक्रम पाहता त्याची सरासरी 66 आहे. यादरम्यान सॅमसनने 2 अर्धशतकांच्या खेळीसह 5 वेळा नाबाद परतला आहे. अशा स्थितीत कर्णधार रोहित आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांना सूर्याच्या संघातील स्थानाबाबत लवकर निर्णय घ्यावा लागेल.

Asia Champion कुस्ती स्पर्धेत जामखेड गाजलं; सुजय तनपुरेला सुवर्णपदक

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सूर्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात फलंदाजी करताना केवळ 19 धावा करणाऱ्या सूर्यकुमार यादवच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सर्वांच्या कामगिरीवर लक्ष असेल. सूर्याला या संधीचा फायदा उठवता आला नाही, तर त्याला आशिया चषक आणि विश्वचषक संघात स्थान मिळवणे कठीण होऊ शकते.

Tags

follow us