India vs Westindies 2nd Test Ashwin: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना त्रिनिदादमध्ये खेळवला जात आहे. टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. पहिल्या कसोटीत त्याने 12 विकेट घेतल्या होत्या. आणि या कसोटीच्या पहिल्या डावातही चांगली गोलंदाजी केली. त्रिनिदाद कसोटीच्या शेवटच्या दिवशी अश्विन गेम चेंजर ठरू शकतो, असे मत वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने व्यक्त केले आहे. वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना अश्विनपासून दूर राहावे लागेल, असेही तो म्हणाला.
भारत-वेस्ट इंडिज कसोटीवर सिराजने प्रतिक्रिया दिली आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, तो म्हणाला की, “पिच ज्या प्रकारे वागते आहे, मला वाटते अश्विन वेस्ट इंडिजच्या फलंदाजीवर प्रभाव पाडेल. चेंडू चांगलाच वळत आहे.” तसेच इशान किशनचा उल्लेख करत सिराज म्हणाला, “इशान आक्रमक फलंदाज आहे. ऋषभ पंत इथे नाही. पंतच्या अनुपस्थितीत ईशानने त्याची उणीव भरून काढली पण ती उणीव आणखी पूर्ण होऊ शकली नाही.
खाजगी विनोद झाला त्यामुळे तटकरेंची गळाभेट! जयंत पाटलांनी दोन तासांतच दिला चर्चांना पूर्णविराम…
सिराजने त्याच्या कामगिरीबद्दल सांगितले की, “मला माझ्या कामगिरीचे उच्चांक द्यायला आवडेल, कारण पाच विकेट घेणे सोपे नाही.” मी एक योजना आखली होती. चेंडू रिव्हर्स स्विंग होत असताना मी लाईन आणि लेन्थ अचूक ठेवली. माझी योजना सोपी होती. जेव्हा चेंडू फार काही करू शकत नव्हता तेव्हा मी स्टंप टू स्टंप बॉलिंग करत होतो.
धर्मवादावरुन Ashutosh Rana यांची परखड भूमिका; म्हणाले, “क्या खुदा ने मंदिर तोडा…”
विशेष म्हणजे, सिराजने वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात 23.4 ओव्हरमध्ये 60 धावांत 5 बळी घेतले. त्याने 6 मेडन ओव्हर्स टाकल्या. अश्विनने 33 ओव्हरमध्ये 61 धावा देत एक विकेट घेतली. मुकेश कुमारने 18 ओव्हरमध्ये 48 धावा देत 2 बळी घेतले. रवींद्र जडेजाने 25 ओव्हरमध्ये 37 धावा देत 2 बळी घेतले. वेस्ट इंडिजचे खेळाडू आता दुसऱ्या डावात फलंदाजी करत आहेत.