भारताच्या शेरनींनी अखेर विश्वचषकावर नाव कोरलं, अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला केलं चितपट

भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासातील हा एक अविस्मरणीय विजय ठरला आहे. विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेविरूद्ध विजय मिळवला.

News Photo   2025 11 02T235047.449

News Photo 2025 11 02T235047.449

भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासातील हा एक अविस्मरणीय विजय ठरला आहे. (India vs Australia) 2025 महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला पाणी पाजत महिला संघाने 52 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

भारताने दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 299 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने 50 षटकात 7 गडी गमवून 298 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेसमोर 299 धावांचं लक्ष्य होतं. शेवटच्या चेंडूवर राधा यादव स्ट्राईकला होती. तिने फटका मारला आणि धावत सुटली. पण दोन धावा घेताना दीप्ती शर्मा 58 धावा करून रनआऊट झाली.

या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर 299 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वुलवार्टनं शतकी खेळी केली केली. पण एका बाजूनं अपेक्षित साथ न लाभल्यानं तिचे प्रयत्न अपुरे ठरले. आणि भारतानं एका ऐतिहासिक विजयाला गवसणी.

विश्वविजेते होताच भारतीय संघावर होणार पैशांचा वर्षाव; बीसीसीआय देणार कोटींचे बक्षीस

भारताची सलामीवीर फलंदाज शेफाली वर्माने जबरदस्त खेळी साकारली. तिने 87 धावांची आकर्षक खेळी करून संघाला दमदार सुरुवात करून दिली. शेफालीच्या या खेळीमुळे भारताने सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड घेतली होती. आज सर्वत्र तिच्या पुनरागमनाची चर्चा सुरू होती, कारण असा ‘कमबॅक’ प्रत्येक खेळाडूसाठी प्रेरणादायी आहे.

दीप्ती शर्माच्या गोलंदाजीवर दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वूल्व्हडार्ट १०१ धावांवर झेलबाद होऊन माघारी परतली. बाऊंड्री लाईनवर अमनज्योतने भन्नाट झेल घेतला. तिथच दक्षिण आफ्रिकेच्या हातातून सामना गेल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. कारण ओपनिंगला आल्यापासून लॉरा वूल्व्हडार्ट टिकून होती. तीने जोरदार फलंदाजी केल्याने सामना भारताच्या हातातून ती हिसकावून घेईल असं दिसत होतं. मात्र, तिला आऊट केल्यानंतर भारतीय संघाने विजय पुन्हा खेचून आणला.

Exit mobile version