Download App

‘WTC’ फायनलपूर्वी भारत टेन्शनमध्ये; विराट कोहली जखमी

WTC Final : आयपीएल 2023 चा शेवटचा साखळी सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यातील झाला. या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. कोहलीच्या दुखापतीने भारतीय क्रिकेट टीमला आणि चाहत्यांना मोठी चिंता लागली होती. कारण भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल काही दिवसांवर आली आहे. अशावेळी विराट कोहलीची दुखापत भारताला महागात पडली असती पण विराटच्या तंदरुस्तीबद्दल नवीन अपडेट आली आहे.

शेवटच्या साखळी सामन्यात गुजरातकडून सहा गडी राखून पराभूत झाल्यानंतर आरसीबी आयपीएलमधून बाहेर पडला आहे. शतक झळकावल्यानंतर कोहलीने विजय शंकरचा शानदार झेल घेतला, पण त्यादरम्यान त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. कोहलीला मदत करण्यासाठी फिजिओ आला पण विराटला मैदान सोडावे लागले आणि शेवटची पाच षटके डगआऊटमध्ये बसला होता.

IPL 2023: शुबमन गिलला नेटकऱ्यांनी केले ट्रोल; पाहा व्हायरल झालेले ट्विट

विराट कोहलीच्या दुखापतीबद्दल माहिती देताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे मुख्य प्रशिक्षक संजय बांगर म्हणाले की रॉयल चॅलेंजर्स बंगळुर आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यादरम्यान विराट कोहलीच्या गुडघ्याला दुखापत झाली होती पण आता काळजी करण्यासारखे काही नाही.

विराट कोहलीच्या दुखापतीवर अपडेट देताना संजय बांगर म्हणाले की, “होय, त्याच्या गुडघ्याला किरकोळ दुखापत झाली आहे पण ती गंभीर आहे असे मला वाटत नाही.” कोहली सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्सविरुद्ध सलग सामन्यात शतके झळकावली.

ते पुढं म्हणाले की, ”त्याने चार दिवसांत सलग सामन्यात शतके झळकावली. तो असा खेळाडू आहे ज्याला केवळ फलंदाजीतच नव्हे तर क्षेत्ररक्षणातही आपले पूर्ण योगदान द्यायचे आहे. तो खूप धावला. काही दिवसांपूर्वी खेळल्या गेलेल्या सामन्यात तो 40 षटके मैदानावर होता आणि येथे त्याने 35 षटके मैदानात घालवली.”

IPL 2023 Playoffs Schedule: प्लेऑफमध्ये कोण कुणाशी लढणार? जाणून घ्या…

7 जूनपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी मंगळवारी इंग्लंडला रवाना होणार्‍या सात भारतीय खेळाडूंमध्ये कोहलीचा समावेश आहे. कौंटी क्रिकेटमध्ये खेळणारा कसोटीपटू चेतेश्वर पुजारा इंग्लंडमध्येच संघात सामील होणार आहे.

https://youtu.be/Qn8eGBZNqoY

Tags

follow us