IPL 2023 Playoffs Schedule: प्लेऑफमध्ये कोण कुणाशी लढणार? जाणून घ्या…
अखेर लीगच्या सामन्यांनंतर टॉपच्या 4 संघांवर शिक्कामोर्तब झाले आहे. प्लेऑफमध्ये गुजरात टायटन्स, चेन्नई सुपजायंट्स, लखनऊ सुपरजायंट्स आणि मुंबई इंडियन्स हे चार संघ दाखल झाले आहेत. प्लेऑफचे सामने उद्यापासून सुरु होणार असून उद्या गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज संघासोबत होणार आहे. तर दुसरा सामना लखनऊ सुपर जायंटस् विरुद्ध मुंबई इंडियन्समध्ये होणार आहे.
अतिक अहमदची हत्या अन् लॉरेन्स बिन्शोई गँगचे कनेक्शन उघड; हल्लेखोरांची NIA समोर कबुली
दमदार खेळी करत गुजरात संघ पुन्हा एकदा प्लेऑफमध्ये पोहचला आहे. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच गुजरात संघाचा 2022 मध्ये समावेश करण्यात आला होता. IPL 2022 मध्ये गुजरातने राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव केला होता. आताही गुजरातने दमदार प्रदर्शन करीत 14 पैकी 10 सामने जिंकून चांगली कामगिरी केली.
Sara Ali Khan : सारा अली खान पोहोचली अजमेर शरीफ दर्ग्यात; चाहत्यांची मोठी गर्दी
पहिल्या सामन्यात गुजरातने चेन्नईचा 5 विकेटने पराभव केला होता. मात्र, त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. .या स्थितीत क्वालिफायर 1 मध्ये चेन्नई संघाला पराभूत करणे गुजरातसाठी सोपे नसणार आहे.
दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील कॅन्टीनचा गोंधळ पुन्हा चव्हाट्यावर
गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर मुंबई इंडियन्सचा प्लेऑफमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने गुजरात टायटन्सला विजयासाठी 198 धावांचा टार्गेट दिलं होतं. गुजरातने 5 चेंडू आणि 6 विकेट राखून विजयी लक्ष्य गाठलं आहे.
कॅनरा बँकेला कोट्यावधींचा गंडा, नगरच्या समता पतसंस्थेच्या संचालकापर्यंत कनेक्शन
शुभमन गिलच्या 52 चेंडूतील नाबाद 104 धावांच्या खेळीमुळे गुजरातला हा विजय मिळवता आला. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सचं प्लेऑफमध्ये आगमन झालं आहे. मुंबईची टीम चौथ्या स्थानावर आहे. म्हणजे मुंबईला एलिमिनेटरचा सामना खेळायचा आहे. म्हणजे एक हार, गेम ओव्हर असा प्रकार आहे. आता बाद फेरीत दुसरी संधी नाहीय. त्यामुळे मुंबई इंडियन्सला कुठलीही चूक परवडणारी नाही.
दरम्यान, लीग टप्पा संपल्यानंतर गुणतालिकेतील अव्वल 4 संघ प्लेऑफसाठी पात्र ठरणार आहेत. आयपीएलच्या नियमांनुसार टॉप-2 संघांना फायनलमध्ये जाण्यासाठी दोन संधी मिळतात. अशा स्थितीत अंतिम दोनमध्ये पोहोचण्यासाठी सर्वच संघांचे प्रयत्न सुरू आहेत.