Download App

Rohit Sharma : “आता माझा विचार करु नका” : रोहितचा सिलेक्टर्संना मेसेज, दिले निवृत्तीचे संकेत

Image Credit: letsupp

मुंबई : भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) आंतरराष्ट्रीय टी-20 फॉर्मेटमधून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. आगामी टी-20 वर्ल्डकपसाठी माझा विचार करु नका असा मेसेज निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांना पाठविला असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये आहे. वनडे वर्ल्डकपपूर्वीच रोहितने अजित आगरकर यांच्याशी या विषयावर चर्चा केली होती, असाही दावा करण्यात येत आहे. (Indian captain Rohit Sharma has signaled his retirement from the international T20 format.)

पीटीआयने बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे की, रोहित शर्मा नजीकच्या भविष्यात टी-20 खेळण्याची शक्यता नाही. वन डे वर्ल्डकपच्या तयारीसाठी रोहित गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या T20 विश्वचषक उपांत्य फेरीनंतर तो एकही टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळलेला नाही. अॅडलेडमध्ये झालेल्या या सामन्यात इंग्लंडने भारतीय संघाचा 10 गडी राखून पराभव केला होता.

पाकिस्तानचे काही खेळाडू माझे यश…; हसन रझाच्या टीकेला शमीचं जोरदार प्रत्युत्तर

रोहित शर्माने आता केवळ कसोटी क्रिकेट आणि 2025 मध्ये होणार असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपवर लक्ष देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. शिवाय डिसेंबर 2023 ते मार्च 2024 या काळात सात कसोटी सामने खेळले जाणार आहेत. सोबतच आगामी सात महिन्यांच्या काळात भारतीय संघ केवळ तीन एकदिवस सामने खेळणार आहे.

निवडकर्ते नवीन T20 कर्णधाराच्या शोधात ?

टी-20 वर्ल्डकपनंतर हार्दिक पांड्या भारतीय संघाचे टी-20 फॉर्मेटमधील नेतृत्व करत आहे. नोव्हेंबर-2022 पासून भारतीय संघ 6 मालिकांमध्ये 18 सामने खेळला आहे. या कालावधीत निवड समितीने 3 कर्णधार बदलले आहेत. T20 विश्वचषकानंतर हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्यात आले.

त्यानंतर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे कमान सोपवण्यात आली. त्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवण्यात आले आहे. 2021 पासून भारतीय संघाने टी-20 साठी 9 कर्णधार बदलले आहेत. सूर्या हा टी-20 संघाचा 13 वा कर्णधार आहे.

कोरबो, लोरबो, जीतबो! LSG ला टाटा टाटा-बाय बाय; गंभीरची घरवापसी, KKR पुन्हा चॅम्पियन बनणार?

रोहित व्यतिरिक्त भारताकडे शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड असे 4 सलामीवीर आहेत आणि या सर्वांनी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. जर युवा खेळाडू चांगली कामगिरी करू शकले नाहीत तर मात्र निवडकर्ते किंवा बीसीसीआयचे अधिकारी रोहितला त्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगू शकतात.

Tags

follow us

वेब स्टोरीज