कोरबो, लोरबो, जीतबो! LSG ला टाटा टाटा-बाय बाय; गंभीरची घरवापसी, KKR पुन्हा चॅम्पियन बनणार?

कोरबो, लोरबो, जीतबो! LSG ला टाटा टाटा-बाय बाय; गंभीरची घरवापसी, KKR पुन्हा चॅम्पियन बनणार?

भारताचा माजी सलामीवीर क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) आता आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) मेंटॉर असणार आहे. याआधी तो लखनऊ सुपर जायंट्स (LSG) संघाच्या मेंटरची भूमिका बजावत होता. पण आता तो पुन्हा एकदा कोलकाताच्या संघाचा भाग झाला आहे. केकेआरचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी म्हैसूर यांनी आज (22 नोव्हेंबर) रोजी गंभीरच्या पुनरागमनाची माहिती दिली. तसेच मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्यासोबत काम करेल असे सांगितले. (Former India opener Gautam Gambhir will now mentor Kolkata Knight Riders in IPL)

आयपीएल 2023 चा हंगाम संपल्यानंतर गौतम गंभीरने केकेआरचा मालक आणि अभिनेता शाहरुख खानची भेट घेतली होती. याचनंतर तो केकेआर टीमचा पुन्हा एकदा भाग होऊ शकतो अशी अटकळ बांधली जात होती. गंभीर यापूर्वी 2011 ते 2017 या काळात केकेआरच्या संघाचा भाग होता. त्याच्या नेतृत्वात केकेआर संघाने दोनदा विजेतेपद पटकावले. तर पाच वेळा प्लेऑफसाठी पात्र ठरला होता आणि 2014 मध्ये चॅम्पियन्स लीग T20 च्या अंतिम फेरीत पोहोचला होता.

ICC : ‘ट्रान्सजेंडर’ खेळाडूंसाठी बॅड न्यूज! आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दरवाजे बंद

दरम्यान, लखनौ सुपर जायंट्सचे मेंटॉरशिप सोडल्यानंतर गौतम गंभीरने एक्सवर एक भावनिक संदेश शेअर केला. हे पद सोडताना तो खूप भावूक दिसला. यात त्याने लखनऊचे सर्व खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि संघाशी संबंधित सर्वांचा पाठिंबा मिळाल्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच लौखन संघाचे मालक डॉ. संजीव गोयंका यांचेही त्याने आभार मानले. गंभीरने पुढे लिहिले, डॉ. गोएंका यांचे नेतृत्व उत्कृष्ट होते, मला आशा आहे की लखनऊ संघ भविष्यातही चांगली कामगिरी करेल, यामुळे चाहत्यांना अभिमान वाटेल. संघाला शुभेच्छा.

केकेआरमध्ये परतल्यावर गौतम गंभीर काय म्हणाला?

गौतम गंभीरच्या पुनरागमनावर केकेआरने एक पत्रक जारी केले. यात तो म्हणाला, “मी भावनिक नाही, अनेक गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही, पण केकेआरमध्ये परतने हे वेगळे आहे. जिथे हे सर्व सुरु झाले तिथे मी परत आलो आहे, आज पुन्हा एकदा ती जांभळी आणि सोन्याची जर्सी घालण्याचा विचार करतो तेव्हा माझ्या आवंढा गिळताना जडपणा जाणवतो. मी केवळ केकेआरमध्येच नाही तर ‘सिटी ऑफ जॉय’मध्येही परत येत आहे. मी परत आलो आहे…मी हंग्री आहे…माझा टी-शर्ट नंबर 23 असेल…आमी केकेआर”

letsupp Special : ‘एका’ वर्षात ‘दोन’ महाराष्ट्र केसरी : नेमकी खरी स्पर्धा कोणती?

गौतम गंभीर कुटुंबाचा भाग आहे :

केकेआरमध्ये गंभीरचे स्वागत करताना शाहरुख खान म्हणाला, “गौतम नेहमीच कुटुंबाचा एक भाग राहिला आहे. आमचा कधीकाळचा कॅप्टन आता “मार्गदर्शक” म्हणून एका वेगळ्या अवतारात घरी परत येत आहे. त्याची खूप आठवण येते होती. आता आम्ही प्रत्येकजण उत्सुक आहोत. चंदू सर (चंद्रकांत पंडित) आणि गौतम दोघेही टीम केकेआर सोबत अद्भूत करतील, अशी आशा आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube