letsupp Special : ‘एका’ वर्षात ‘दोन’ महाराष्ट्र केसरी : नेमकी खरी स्पर्धा कोणती?

letsupp Special : ‘एका’ वर्षात ‘दोन’ महाराष्ट्र केसरी : नेमकी खरी स्पर्धा कोणती?

17 जानेवारी 2023. 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षे विजयी.

10 नोव्हेंबर 2023. 66 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सिंकदर शेख विजयी.

20 नोव्हेंबर 2023. 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षे विजयी.

गोंधळलात ना? 65 व्या महाराष्ट्र केसरीच्या दोन स्पर्धा कशा काय? हा जसा तुमचा गोंधळ उडाला तसाच आमचा पण उडाला होता. शोध घेतल्यावर कळालं, जानेवारीमध्ये झालेली 65 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही 2022 मधील होती. पण विविध कारणांमुळे लेट झाली होती. पण त्यानंतर 66 वी स्पर्धा पण याच वर्षी पुण्यात झाली. आता 65 आणि 66 वी स्पर्धा झाल्यानंतर 67 वी स्पर्धा होणे अपेक्षित होते पण परत 65 वीच स्पर्धा कशी काय? एकाच वर्षात दोन महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा कशा काय? यातील नेमकी खरी स्पर्धा कोणती? (which exactly real Maharashtra kesari competition in kushti)

तर याच सगळ्या गोंधळात टाकणाऱ्या प्रश्नाची उत्तर शोधण्याचा या व्हिडीओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत.

अखिल भारतीय कुस्तीगीर महासंघ ही राष्ट्रीय पातळीवरची महत्त्वाची संस्था, जी तीन महिन्यांपूर्वी बरखास्त करण्यात आली. आता या वादात न जाता थेट महाराष्ट्र केसरीच्या वादावर येऊ. तर या भारतीय कुस्तीगीर महासंघासोबत विविध राज्यांमधल्या 28 कुस्ती संस्था संलग्न होत्या. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचाही समावेश होता. महाराष्ट्रात गत दोन वर्षांपर्यंत याच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेमार्फत महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा घेतल्या जात असत.

श्रीलंकेकडून आयसीसीने हिसकावले विश्वचषकाचे यजमानपद, आता कुठे होणार स्पर्धा?

कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांनी 1953 साली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली. याच राज्य कुस्तीगीर परिषदेवर जवळपास गेली चार दशके राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे वर्चस्व राहिले. अध्यक्षपद स्वतः शरद पवार यांच्याकडे होते. तर सरचिटणीसपदी बाळासाहेब लांडगे होते.

पण महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने वेळापत्रकाप्रमाणे काही स्पर्धा घेतल्या नाहीत, परिषदेच्या विरोधात काही तक्रारी थेट कुस्ती महासंघाकडे आल्या होत्या. याच आरोपांची दखल घेत भारतीय कुस्ती महासंघाने 30 जून 2022 रोजी राज्य कुस्तीगीर परिषदेचे संचालक मंडळ बरखास्त केले. यावर शरद पवारांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन यावर प्रतिक्रिया दिली आणि हा निर्णय योग्य नसल्याचे सांगितले.

पुढे काय झाले?

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त केल्यानंतर 31 जुलै 2022 रोजी कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. या अध्यक्षपदासाठी तीन अर्ज आले होते. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडून भाजपचे खासदार रामदास तडस, काकासाहेब पवार आणि धवलसिंग मोहिते पाटील यांचा समावेश होता. पण निवडणुकीच्या आधीच काकासाहेब पवार आणि धवलसिंग मोहिते पाटील यांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे रामदास तडस बिनविरोध अध्यक्ष झाले.

इथेपर्यंत सर्व नीट वाटणारे चित्र इथून फिरले. शरद पवार यांच्या अध्यक्षतेत अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या कार्यकारिणीचा कार्यकाळ 2023 सालापर्यंत होता. त्यामुळे बरखास्तीच्या निर्णयाविरोधात परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. इथे 11 नोव्बेंबर 2022 रोजी लांडगेंच्या बाजूने निकाल लागला. राज्य परिषद बरखास्तीचा निर्णय अयोग्य ठरवत उच्च न्यायालयाने जुनी कार्यकारिणी आपला कार्यकाळ संपेपर्यंत परिषदेच्या घटनेप्रमाणे कामकाज पाहिलं असे स्पष्ट केले.

या निर्णयावर आपले मत मांडताना बाळासाहेब लांडगे म्हणाले, “महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची घटना आहे. त्याप्रमाणे आमच्या निवडणुका होत असतात. 2019-2023 या कालावधीसाठी निवडणुका झाल्या. चॅरिटी कमिशनर यांच्या स्वतःच्या निरिक्षणाखाली गुप्त मतदान पद्धतीने ही निवडणूक झाली. त्यामध्ये जे हरले ते आकसाने आणि सुडबुद्धीने खोट्या प्रसिद्धीसाठी काम करायला लागले.” यानंतर पुन्हा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद कायमस्वरुपी काम करु लागली.

पण भारतीय कुस्ती महासंघाने पुन्हा एकदा गैरव्यवहार आणि विविध आरोप करत तुमची संलग्नताच का रद्द करु नये? अशी कारणे दाखवा नोटीस महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला बजावली. या नोटिसीला परिषदेने कोणतेही उत्तर न दिल्याने भारतीय कुस्ती महासंघाने राज्य कुस्तीगीर परिषदेची संलग्नताच रद्द केली. यानंतर अस्थायी समितीची स्थापना करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष म्हणून संजयकुमार सिंह यांची नियुक्ती केली.

Video : विविधतेत एकता! रोहित, विराटला धीर तर, जडेजाशी मोदींचा गुजरातीत संवाद

या समितीने जानेवारी 2023 मध्ये 2022-2023 ची पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघ यांच्या सहकार्याने आणि मुरलीधर मोहोळ संस्कृती प्रतिष्ठानतर्फे 65 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यात आयोजित केली. त्यात शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी ठरला होता. पण त्याच दरम्यान राज्य कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांनी 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करणार असल्याचे प्रसिध्दी पत्रक काढले.

हा सगळा वाद सुरु असतानाच अस्थायी समितीने पुन्हा निवडणुका घेतल्या. यात पुन्हा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे रामदास तडस अध्यक्षपदी निवडून आले तर तर मुरलीधर मोहोळ उपाध्यक्ष झाले. पण या निवडणुकीला भारतीय कुस्ती महासंघाची मान्यताच मिळाली नाही. कारण ही निवडणूक झाल्याच्या दोन ते तीन दिवसातच भारतीय कुस्ती महासंघाचीच मान्यता जागतिक कुस्ती संघटनेने रद्द केली.

पण यानंतर देखील नुकतेच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने पुण्यात फुलगावला 66 वी कुस्ती स्पर्धा घेतली. यात सिकंदर शेख विजयी ठरला. तर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने घोषणा केलेली 65 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा नुकतीच धाराशिवला पार पडली. यात पुन्हा शिवराज राक्षेच विजयी झाला.

सध्या थोडक्यात सांगायचे तर राज्य कुस्तीगीर परिषदेची संलग्नता रद्द केली आहे आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या निवडणुकीला कुस्ती महासंघाची मान्यताच मिळालेली नाही. दुसऱ्या बाजूला सध्या भारतीय कुस्ती महासंघ अस्तित्वात नाही. त्यामुळेच जाणकारांच्या मते ’66 वी कुस्ती स्पर्धा जी नुकतीच पुण्यात पार पडली ती आणि 65 वी कुस्ती स्पर्धा जी धाराशिवला पार पडलेली’ अशा दोन्ही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा बेकायदेशीर किंवा अवैधच आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube