ICC : ‘ट्रान्सजेंडर’ खेळाडूंसाठी बॅड न्यूज! आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दरवाजे बंद

ICC : ‘ट्रान्सजेंडर’ खेळाडूंसाठी बॅड न्यूज! आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दरवाजे बंद

ICC bans transgender Players : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. ट्रान्सजेंडर क्रिकेटर्स आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये खेळू शकणार (ICC bans transgender Players) नाहीत. अहमदाबाद येथे मंगळवारी पार पडलेल्या आयसीसीच्या (ICC) बैठकीत या वृत्ताला दुजोरा देण्यात आला. दोन वर्षांनंतर या नियमाचा आढावा घेतला जाईल. या वर्षाच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणारी पहिली ट्रान्सजेंडर खेळाडू ठरलेल्या डॅनियल मॅकगीवर आयसीसीच्या या निर्णयाचा परिणाम होईल. डॅनियल मॅकगी ही खेळाडू ऑस्ट्रेलियाची आहे. परंतु, 2020 मध्ये ती कॅनडाला गेली आणि 2021 मध्ये पुरुषातून महिला बनली. सप्टेंबर 2023 मध्ये ती महिला टी 20 अमेरिका क्वालिफायरमध्ये कॅनडाकडून खेळली.

श्रीलंकेकडून आयसीसीने हिसकावले विश्वचषकाचे यजमानपद, आता कुठे होणार स्पर्धा?

आयसीसीच्या या नव्या नियमानुसार पुरषातून महिला बनलेल्या (ट्रान्सजेंडर महिला खेळाडू) खेळाडूला आंतरराष्ट्रीय सामन्यात भाग घेण्याची परवानगी राहणार नाही. जरी त्यांनी लिंग बदल शस्त्रक्रिया केली असली तरी त्यांना परवानगी मिळणार नाही असे आयसीसीने स्पष्ट केले आहे. आयसीसीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की हा निर्णय डॉ. पीटर हरकोर्ट यांच्या अध्यक्षतेतील आयसीसी वैद्यकिय सल्लागार समितीच्या नेतृत्वात केलेल्या आढाव्यानंतर घेतला आहे. हा निर्णय आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट सामन्यांसाठी लागू राहणार आहे. सदस्य मंडळे देशांतर्गत पातळीवर लैंगिक पात्रतेबाबत काय निर्णय घेतात हे त्यांच्यावर अवलंबून राहणार आहे.

महिला क्रिकेटमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय व्यतिरिक्त फ्रँचायझी महिला क्रिकेटलाही चालना मिळत आहे. सन 2023 मध्ये भारतात प्रथमच महिला आयपीएलचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या पहिल्या सत्रात पाच संघ सहभागी झाले होते. आता 2024 मध्येही महिला प्रीमियर लीग आयोजित केली जाणार आहे.

फलंदाजांना मिळणार फुकटात 5 धावा, आयसीसीने जाहीर केला ‘स्टॉप क्लॉक’ नियम

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube