Prithvi Shaw: भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू पृथ्वी शॉ हा अनेक महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. मधल्या काळात त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. इंग्लंडमध्ये क्लब क्रिकेट खेळण्यासाठी तो गेला होता. तेथे नॉर्थम्प्टनशायरकडून खेळताना त्याने एक शानदार द्विशतक झळकविले होते. परंतु खेळताना तो दुखापतग्रस्त झाला आहे. त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याला आणखी काही महिने तरी क्रिकेटपासून दूर राहावे लागणार आहेत. त्यामुळे संघात पुन्हा येण्यासाठी त्याला आता झगडावे लागणार आहे.
३ लाखांची लाच घेताना रेल्वे अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात, घरात सापडले २.६१ कोटीचं घबाड
पृथ्वीला तीन-चार महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागू शकते, असे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. तर बीसीसीआयनेही पृथ्वीच्या दुखापतीबाबत दुजोरी दिलाय. तीन-चार महिने तो क्रिकेटपासून दूर राहणार आहे. पृथ्वीला दुखापत झाल्यानंतर एमआरआय स्कॅन करण्यात आला. लिगामेंटमध्ये दुखापत झाल्याचे आढळून आले आहे. पृथ्वीच्या पायावर शस्त्रक्रिया होणार की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नसल्याची माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.
Naseeruddin शाहांच्या वक्तव्यावर नाना पाटेकरांनी सुनावलं; म्हणाले, ‘राष्ट्रवादाच्या नावाखाली…’
पृथ्वीने नॉर्थम्प्टनशायरसाठी खेळताना एका लढतीत नाबाद 125 धावा कुटल्या होत्या. तर एका सामन्यात त्याने 244 धावांची जबरदस्त खेळी केली होती. देशांतर्गत क्रिकेट आणि क्लब क्रिकेटमध्ये तुफान खेळी करणाऱ्या पृथ्वीला आता दुखापतीने ग्रासले आहे. सलामीवीर असलेला पृथ्वी हा गेल्या दोन वर्षांपासून भारतीय क्रिकेट संघापासून दूर आहे. त्याने शेवटचा सामना जुलै 2021 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. पृथ्वीने त्याचा शेवटचा कसोटी सामना डिसेंबर 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता.
पृथ्वी शॉची कामगिरी
पृथ्वी शॉ याने भारताकडून पाच कसोटी सामने खेळताना 339 धावा केल्या आहेत. त्यात एक शतक आणि दोन अर्धशतके केली आहे. तर सहा एकदिवसीय सामनेला खेळला आहे. तर एक टी-20 सामना खेळला आहे. त्याने प्रथम श्रेणीत क्रिकेटमध्ये 78 डावांमध्ये 3802 धावा केल्या आहेत. यात 12 शतके आणि 16 अर्धशतकांचा समावेश आहे.