Indian Cricketer Shubman Gill Ishan Kishan : मैदानावर आपल्या अनोख्या खेळीने मन जिंकणारी भारतीय संघातील दोन महत्वाच्या खेळाडूंबाबत एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. हे खेळाडू एका अपघातातून बालबाल बचावले आहे. भारतीय संघाचे इशान किशन आणि शुबमन गिल असे या दोन खेळाडूंचे नाव आहे. हे दोघेही बॉल लागण्यापासून थोडक्यात वाचले नाहीतर मोठा अनर्थ झाला असता.
दरम्यान काही दिवसांपूर्वी भारतचा स्टार खेळाडू वृषभ पंत हा एका कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. विशेष म्हणजे त्यांच्या कारचा एवढा भयंकर अपघात झाला होता की दैव बलवत्तर म्हणून पंत यामधून सुखरूप बचावला होता. मात्र यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. दरम्यान भारताचे दोन खेळाडू हे एका घटनेतून थोडक्यात बचावले आहे.
मोदींना जेवढ्या शिव्या देतायत तेवढे ते प्रसिद्ध होतायत; फडणवीसांचा ठाकरेंना टोला
नेमकं काय घडलं होतं? जाणून घ्या
इशान किशन आणि शुबमन गिल हे दोघेही मैदानात एकमेकांसोबत बोलत होते. दोघेही सरावासाठी जात होते. याचवेळी दुसऱ्या बाजूला सराव सुरु होता. हे दोघे बोलत असताना या दोघांच्या दिशेने एक बॉल वेगात आला आणि सुदैवाने तो जवळ पडला. मात्र या दोघांपैकी एकाला जरी हा बॉल लागला असता तरी ते गंभीर जखमी झाले असते. दोघांचंही या बॉलकडे लक्ष नसताना हा प्रकार घडला होता. धक्कादायक बाब म्हणजे हे दोघेही सरावासाठी जात असल्याने त्यांनी हेल्मेटही घातलेले नव्हते.
पाकिस्तानी वंशाचे लेखक-पत्रकार तारिक फतेह यांचं निधन
क्रिकेट मैदानावर खेळाडू हे सिजन बॉलने खेळात असतात. या बॉलचा फटका हा जोरात लागतो. दरम्यान काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिलिप ह्युज याचाही बॅटिंगदरम्यान बॉल लागल्याने दुर्देवी मृत्यू झाला होता. यामुळे ग्राउंडवर सरावासाठी जात असताना खेळाडूंनी सावधानता बाळगावी अशा सूचना देखील त्यांना देण्यात येत असतात.