Download App

430 धावांवर टीम इंडियाचा डाव घोषित, जैस्वाल-सर्फराजची वादळी खेळी; इंग्लंडला 557 धावांचे लक्ष्य

IND Vs ENG : भारताने 4 बाद 430 धावांवर दुसरा डाव घोषित केला. यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) 214 धावा करून नाबाद परतला आणि सर्फराज खान (Sarfaraz Khan) 68 धावा करून नाबाद परतला. आक्रमक फलंदाजी करत भारताने इंग्लंडला 557 धावांचे लक्ष्य दिले आहे. इंग्लंडकडे लक्ष्य गाठण्यासाठी दीड दिवसांचा अवधी आहे.

कसोटीचा चौथा दिवस सुरू आहे. यशस्वी जैस्वाल तिसऱ्या दिवशी शतक पूर्ण केल्यानंतर दुखापतग्रस्त झाला होता, त्याला पाठ दुखीचा त्रास जाणवत होता. मात्र चौथ्या दिवशी तो पुन्हा फलंदाजीला आला आणि त्याने द्विशतक पूर्ण केले. जैस्वालने 236 चेंडूत 14 चौकार आणि 12 षटकारांच्या मदतीने 214* धावा केल्या.

12 षटकार मारून कसोटीच्या एका इनिंगमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या वसीम अक्रमच्या विक्रमाची बरोबरी केली. आता जैस्वाल कसोटी डावात सर्वाधिक षटकार मारणारा संयुक्तपणे पहिल्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे.

भारताच्या दुसऱ्या डावात इंग्लिश गोलंदाज पूर्णपणे हतबल दिसत होते. संघाकडून रेहान अहमद, टॉम हार्टली आणि जो रूट यांनी 1-1 विकेट घेतली. याशिवाय शुभमन गिल 91 धावांवर रनआऊट झाला.

क्रिकेट कोचचे लज्जास्पद कृत्य, मद्यपान करतानाचे व्हिडिओ व्हायरल

भारताचा संपूर्ण डाव
दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. 12व्या षटकात 30 धावांवर कर्णधार रोहित शर्माची पहिली विकेट गमावली. रोहित 28 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने केवळ 19 धावा करू शकला.

त्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी दुसऱ्या विकेटसाठी 159 (201 चेंडू) धावांची भागीदारी केली, त्यानंतर जैस्वाल रिटायर्ड हर्ट झाला. त्यानंतर रजत पाटीदार फलंदाजीला आला आणि 10 चेंडू खेळूनही खाते न उघडता बाद झाला. यानंतर गिल आणि कुलदीप यादव यांनी चौथ्या विकेटसाठी 55 (98 चेंडू) धावांची भागीदारी केली. तिसऱ्या दिवशी विकेट वाचवण्यासाठी कुलदीप नाईट वॉचमन म्हणून आला होता.

कन्फर्म! आर. अश्विन पुन्हा संघात परतणार; ‘बीसीसीआय’नेच केलं शिक्कामोर्तब

यानंतर यशस्वी जैस्वालने सहाव्या क्रमांकावर आलेल्या सरफराज खानसोबत 172* (158 चेंडू) धावांची भागीदारी केली. यादरम्यान जैस्वालने 214* आणि सर्फराज खानने 72 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 68* धावा केल्या. यानंतर रोहित शर्माने डाव घोषित करण्याची घोषणा केली.

Shriya Saran : साउथ इंडियन ब्युटी श्रिया सरनच्या लूकने वेधलं चाहत्यांचं लक्ष

follow us

वेब स्टोरीज