Indian National Anthem played in Aus VS Eng Match in Pak : सध्या पाकिस्तानमध्ये चॅपियन्स ट्रॉफी 2025 सुरू आहे. यामध्ये नेहमीच काही ना काही तरी फजिती होणारा देश म्हणजे पाकिस्तानकडून यावेळी देखील अशीच चूक झाली. आज शनिवारी 22 फेब्रुवारी 2025 रोजी ऑस्ट्रेलिया विरूद्ध इंग्लंड हा सामना सुरू होत असताना मैदानावर भारताचं राष्ट्रगीत सुरू झालं होतं.
विमानात तुटलेली खुर्ची…केंद्रीय मंत्र्यांचा एअर इंडियावर संताप, कॉंग्रेसनेही सत्ताधाऱ्यांना घेरलं
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांकडून पाकिस्तानची खिल्ली उडवली जात आहे. तसेच चॅपियन्स ट्रॉफीमध्ये असं पहिल्यांदाच झालं आहे. की, पाकिस्तानच्या स्टेडियममध्ये भारताच राष्ट्रगीत लावण्यात आलं. कारण चॅपियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये जरी सुरू असली तरी भारताचे सामने पाकिस्तानमध्ये नाही तर दुबईमध्ये ठेवण्यात आले आहेत.
Indian national anthem in #ENGvsAUS match😂
yeh yeh porki bolte hai hamara andian mazaak kyu udaate hai…#ChampionsTrophy2025 pic.twitter.com/KgSjOkdnLt— sachin gurjar (@SachinGurj91435) February 22, 2025
नेमकं काय झालं?
सध्या पाकिस्तानमध्ये चॅपियन्स ट्रॉफी 2025 सुरू आहे. यामध्ये आजचा ऑस्ट्रेलिया विरूद्ध इंग्लंड हा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॅटींगचा निर्णय घेतला. त्यानंतर दोन्ही टीमचे खेळाडू राष्ट्रगीतासाठी मैदानावर आले. इंग्लंडचं राष्ट्रगीत झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचं राष्ट्रगील लावण्याऐवजी भारताचं राष्ट्रगीत जन गण मन… लावण्यात आलं. एक-दोन सेकंडमध्ये ते बदलण्यात आलं. मात्र त्यामुळे स्टेडियममध्ये एकच गोंगाट पाहायला मिळाला.
समुद्रात जाणं आलं अंगलट! तारकर्ली समुद्रात पुण्याचे पाच जण बुडाले, दोघांचा मृत्यू
भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी सट्टा बाजार उसळला…
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला, अगदी इतर कोणत्याही भारतीय संघाच्या तुलनेत, सर्वाधिक प्रेक्षक हजेरी लावतात. अशा परिस्थितीत, सट्टा बाजारही दोन्ही संघांना एकमेकांविरुद्ध खेळताना पाहण्याची दुर्मिळ संधी सोडत नाही. रविवारी, २३ फेब्रुवारी रोजी, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जागतिक क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजेच भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहायला मिळेल. या सामन्याबाबत सट्टेबाजीचा बाजार एक दिवस आधीच तापला आहे.एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार सट्टेबाजी बाजारात भारतीय संघाला सगळ्या जास्त पसंती मिळत असून भारतावर ४१ ते ४२ रुपये भाव लावला जात आहे. एवढेच नाही तर मोठा डाव खेळून आव्हानात्मक धावसंख्येसाठीही भारतीय टीम मजबूत दिसत आहे.