IND vs NZ : न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; आकाश दीपसह ‘या’ खेळाडूला पुन्हा संधी

IND vs NZ : बीसीसीआयने न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. पाच टी20 सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा काही

IND Vs NZ

IND Vs NZ

IND vs NZ : बीसीसीआयने न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. पाच टी20 सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती तर आता एक दिवसीय मालिकेसाठी आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. हंगामी मुख्य निवडकर्ता प्रज्ञान ओझा यांच्या नेतृत्वाखालील वरिष्ठ पुरुष निवड समितीने या सात सामन्यांसाठी तीन वेगवेगळे संघ जाहीर केले. या दौऱ्यासाठी ऋषभ पंत आणि वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा यांचा संघात समावेश करण्यात आला आहे मात्र त्यांची उपस्थिती फिटेनसवर अवलंबून राहणार आहे. तर 21 वर्षीय यष्टिरक्षक-फलंदाज कुमार कुशाग्राला पहिल्यांदाच भारतीय संघात स्थान मिळाले आहे.

भारताचा न्यूझीलंड दौरा 22 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे, ज्याची सुरुवात पाच सामन्यांच्या टी20 मालिकेने होईल. एकदिवसीय मालिका 4 नोव्हेंबरपासून आणि 19 नोव्हेंबरपासून कसोटी मालिका खेळवली जाईल. एकदिवसीय आणि कसोटी मालिकेदरम्यान पुरेसा वेळ नसल्यामुळे, शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी संघात बदल करण्यात आले आहे. निवडकर्त्यांनी पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी एक मुख्य संघ जाहीर केला असून, शुभमन गिलकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानंतर, शुभमन गिल, के.एल. राहुल आणि इतर काही खेळाडू कसोटी मालिकेच्या तयारीसाठी रवाना होतील. चौथ्या आणि पाचव्या एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यर संघाचे नेतृत्व करेल, तर इशान किशन या दोन सामन्यांसाठी उपकर्णधार असेल.

कसोटी संघात वेगवान गोलंदाज आकाश दीपचे पुनरागमन झाले असून तो तब्बल एका वर्षानंतर भारतीय संघात परतला आहे. दुखापतीमुळे मैदानापासून दूर असलेला आकाश अलीकडेच इराणी कप आणि त्यानंतर रणजी ट्रॉफी सामन्याद्वारे पुन्हा मैदानात उतरला होता. याशिवाय वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजलाही कसोटी संघात बोलावण्यात आले आहे.

उद्धव ठाकरेंना शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी; पण ‘या’ अटींचं पालन करावं लागणार-

न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ

T20I संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, वैभव सूर्यवंशी, इशान किशन, तिलक वर्मा, अक्षर पटेल, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, प्रिन्स यादव, मयंक यादव, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव.

ODI संघ (पहिल्या 3 सामन्यांसाठी)

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, नमन धीर, अंशुल कंबोज, गुरनूर ब्रार, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंह, इशान किशन, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा*, कुलदीप यादव.

4थ्या-5व्या ODI साठी:

श्रेयस अय्यर (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, तिलक वर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, नमन धीर, औकीब नबी, गुरनूर ब्रार, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंह, कुमार कुशाग्र, मोहम्मद सिराज, यश ठाकूर, कुलदीप यादव.

कसोटी संघ

शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, ऋषभ पंत*, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, अंशुल कंबोज, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, साई सुदर्शन, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज

Exit mobile version