Download App

टीम इंडियाच्या आणखी एका दौऱ्याची घोषणा… ‘या’ देशाबरोबर होणार वनडे आणि T20 मालिका

India tour of Sri Lanka : आयसीसीच्या वनडे विश्वचषकामध्ये (ODI World Cup) चमकदार कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाला विजेतेपद न पटकावल्याची खंत आहे. मात्र आता संघ आपले दु:ख विसरून पुढे जात आहे. सध्या, भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची मायदेशात टी-20 मालिका खेळत आहे. भारत पहिल्या 3 सामन्यात 2-1 ने आघाडीवर आहे.

आता या मालिकेनंतर भारतीय संघाला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जायचे आहे. पण दरम्यान, भारतीय संघाच्या आणखी एका मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. पुढील वर्षी जुलैमध्ये श्रीलंकेविरुद्ध (India vs Sri Lanka) ही मालिका होणार आहे.

भारतीय संघ जुलैमध्ये श्रीलंकेचा दौरा करणार
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आज ही मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, भारतीय संघ जुलै 2024 मध्ये श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाईल, जिथे दोन्ही संघांमध्ये 3 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

राहुल द्रविडला मुदतवाढ पण अनेक प्रश्न अनुत्तरित, क्रिकेटप्रेमींमध्ये संभ्रम

या मालिकेपूर्वी 2024 टी-20 विश्वचषकही होणार आहे. म्हणजेच या मोठ्या स्पर्धेनंतर श्रीलंकेचा दौरा होणार आहे. तसेच श्रीलंका क्रिकेट बोर्डाने 2024 चे आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॅलेंडर जारी केले आहे. श्रीलंकेचा संघ पुढील वर्षाची सुरुवात जानेवारीत झिम्बाब्वेविरुद्ध घरच्या मालिकेने करेल.

आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियाची परीक्षा…
10 डिसेंबरपासून सुरू होणारा भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा हा टीम इंडियासाठी अग्निपरीक्षा असणार आहे. तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामने होणार आहेत. त्यात सेंच्युरियन (26 डिसेंबरपासून) आणि केपटाऊन (3 जानेवारीपासून) येथे दोन कसोटी सामने होतील. त्यानंतर जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे.

KBC 15: 14 वर्षांच्या मयांकने ‘केबीसी’मध्ये जिंकले 1 कोटी रुपये, उत्तरानं सर्वांचं लक्ष वेधलं

दरम्यान, बीसीसीआयने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाबाबत सुरू असलेला सस्पेन्स संपवला आहे. टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड भविष्यातही मुख्य प्रशिक्षकपदी राहणार आहे. द्रविडसोबतच टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफसाठी करार वाढवण्यात आला आहे. मात्र, कराराचा कालावधी किती असेल याबाबत बीसीसीआयने अद्याप काहीही स्पष्ट केलेले नाही.

Tags

follow us