Download App

मोठी बातमी : विनेश फोगट ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीसाठी अपात्र; एक चूक पडली महागात

विनेशचे वजन काही ग्रॅम वाढल्याने तिला अंतिम सामन्यासाठी अपात्र करण्यात आले आहे. 

  • Written By: Last Updated:

Vinesh Phogat disqualified from Olympics for being overweight : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महिला कुस्तीच्या 50 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यापूर्वी कुस्तीपटू विनेश फोगटला (Vinesh Phogat) मोठा झटका बसला आहे. वजन जास्त असल्याने तिला अंतिम सामन्यापूर्वी अपात्र घोषित करण्यात आले आहे. मंगळवारी (दि.6) तिने उपांत्य फेरीत क्युबाच्या लोपेझ गुझमनचा 5-0 असा पराभव केला होता.  महिला कुस्तीत ऑलिम्पिकच्या (Paris  Olympic) अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली महिला कुस्तीपटू ठरली होती.

अंतिम सामन्यापूर्वी करण्यात आलेल्या चाचणीत विनेशचे वजन निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळून आल्याने तिला अपात्र घोषित करण्यात आले आहे. रिपोर्ट्सनुसार, विनेश फोगटचे वजन निर्धारित मर्यादेपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आता 50 किलो वजनाच्या अंतिम सामन्यात विनेश फोगट खेळू शकणार नाहीये. अंतिम सामन्यापूर्वी विनेशवर करण्यात आलेल्या या कारवाईमुळेे करोडो भारतीयांच्या पदक मिळवण्याच्या स्वप्नावर पाणी फेरले गेले आहे.

http://Olympics 2024: विनेश फोगटने रचला इतिहास, चाहत्यांची आमिरकडे ‘दंगल 2’ मागणी

उपांत्य फेरीत विनेशचा विजय

मंगळवारी झालेल्या सामन्यात पहिल्या फेरीपर्यंत विनेश 1-0 अशी आघाडीवर होती. त्यानंतर शेवटच्या तीन मिनिटांत तिने क्युबाच्या कुस्तीपटूवर आक्रमण करत चार गुणांची कमाई करत अंतिम फेरीत धडक मारली.

http://Kangana Ranaut: ‘मोदी तेरी कब्र खुदेगी’च्या घोषणा देऊन..; विनेशसाठी अभिनेत्रीची खास पोस्ट

अंतिम फेरीत अमेरिकन कुस्तीपटूशी होणार होता सामना

उपांत्य फेरीत क्युबाच्या लोपेझ गुझमनचा 5-0 असा पराभव केल्यानंतर भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटा समाना अमेरिकन कुस्तीपटूशी होणार होता. ज्या कुस्तीपटूशी विनेशचा अंतिम सामना होणार होणार होता. तिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. तसेच वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दोन रौप्य आणि दोन कांस्यपदकेही जिंकली आहेत. हा सामना रात्री 12.30 वाजता (8 ऑगस्ट) उशिरा खेळला जाणार होता. मात्र, आता वजन वाढल्याने भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला अपात्र ठरवण्यात आले आहे.

follow us