इंग्लंड दौऱ्यात भारताची विजयी सलामी; 259 धावांचे लक्ष्य पार करत इंग्लंडचा 6 विकेट्सने पराभव

शुभमन गिलच्या दमदार 80 धावा आणि अक्षर-वॉशिंग्टनच्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारताचा इंग्लंडवर 6 विकेट्सने दणदणीत विजय.

Untitled Design (24)

Untitled Design (24)

India’s magnificent victory : इंग्लंड दौऱ्यातील पहिल्याच एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत यजमान इंग्लंडचा 6 विकेट्सने पराभव केला आणि तीन सामन्यांच्य मालिकेत 1-0 आधी आघाडी घेतली. इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीवीरांनी 61 धावांची भागीदारी करत संघाला चांगली सुरूवात करून दिली. मात्र त्यांनतर भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत इंग्लंडला मोठे धक्के दिले. एका टप्प्यावर इंग्लंडची अवस्था 5 बाद 80 अशी झाली होती. तर सहावी विकेट 107 धावांवर पडली. संकटात इंग्लंडचा डाव जो रुट आणि लियाम डॉसन यांनी सावरला.

दोघांनी सातव्या विकेटसाठी 121 धावांची महत्वपूर्ण भागीदारी करत संघाला 258 धावांपर्यंत पोहोचवले. सातवी विकेट 228 धावांवर पडल्यानंतर इंग्लंडचा डाव 258 धावांवर आटोपला. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 4 विकेट्स घेत इंग्लंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. गुरनूर ब्रार आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तर शिवम दुबे आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 1 विकेट मिळवली. 259 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरूवात निराशजनक झाली.

मुंबईतील तीन नामांकित हॉटेलचे परवाने निलंबित; पथक थेट किचनमध्ये, पुढ दिसलं ते भयंकर…

कर्णधार रोहित शर्मा 21 चेंडूत 11 धावा करून बाद झाला, तर विराट कोहलीला देखील केवळ 5 धावांवर माघारी परतावे लागले. दोन प्रमुख फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी डावाची सूत्रे हाती घेत भारताला सावरले. दोघांनी संयमी फलंदाजी करत संघाची धावसंख्या पुढे नेली. शुभमन गिलने शानदार फलंदाजी करत 80 धावांची खेळी केली, मात्र दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावे लागले. श्रेयस अय्यरने 35 धावांचे योगदान दिले, मात्र तो बाद धावबाद झाला. त्यानंतर केले राहुल केवळ 1 धाव करून बाद झाल्याने भारतावर पुन्हा दबाव निर्माण झाला.

मात्र अशा कठीण परिस्थितीत अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी जबाबदारी स्वीकारली. दोघांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा संयमाने सामना करत पाचव्या विकेटसाठी 102 धावांची अभेद्य भागीदारी रचली. अक्षर पटेलने 57 धावांची तर वॉशिंग्टन सुंदरने 52 धावांची अर्धशतकी खेळी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. त्यांच्या दमदार भागीदारीच्या जोरावर भारताने 6 विकेट्स राखून लक्ष्य गाठले आणि मालिकेतील पहिला सामना आपल्या नावावर केला. या विजयासह भारताने इंग्लंड दौऱ्याची विजयी सुरुवात केली असून आता मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना 16 जुलै रोजी खेळवला जाणार आहे.

Exit mobile version