Download App

World Athletics Championships : भारताच्या पुरुष संघाची 4×400 मीटरच्या अंतिम फेरीत धडक

हंगेरीतील बुडापेस्ट येथे सुरू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताच्या पुरुष संघाने 4×400 मीटर रिले शर्यतीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारतीय संघ प्रथमच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. (India’s men’s team has entered the finals of the 4x400m relay race at the championships)

मुहम्मद अनास याहिया, अमोज जेकब, मुहम्मद अजमल वरियाथोडी आणि राजेश रमेश या भारतीय चौकडीने हे यश मिळवले. भारतीय पुरुष संघाने 4×400 मीटर रिले शर्यतीत 2 मिनिटे 59.05 सेकंद अशी वेळ नोंदवून आशियाई विक्रम मोडला. यापूर्वीचा 2 मिनिटे 59.51 सेकंदांसह हा विक्रम जपानच्या खेळाडूंच्या नावावर होता.

भारतीय महिला अंध क्रिकेट टीमने रचला इतिहास, ऑस्ट्रेलियाला हरवून सुवर्णपदकावर कोरले नाव

अव्वल स्थानावर राहून अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या अमेरिकेविरुद्ध भारताला हीट-१ मध्ये ठेवण्यात आले होते. अमेरिकन खेळाडूंनी ही शर्यत दोन मिनिटे 58.47 सेकंदात पूर्ण केली. भारत शर्यतीत ग्रेट ब्रिटन आणि बोत्सवानासारख्या संघांपेक्षा पुढे होता, ही कामगिरी आश्चर्यकारक होती. जमैका (2:59:82 सेकंद), फ्रान्स (3:00:05 से.) इटली (3:00:14 से.) आणि नेदरलँड (3:00:23 से.) यांनी हीट-2 मधून अंतिम फेरीत प्रवेश केला.

पहिल्या रननंतर सहाव्या क्रमांकावर असलेल्या मुहम्मद अनास याहियाने भारताची सुरुवात केली. यानंतर अमोज जेकबच्या शानदार रनने भारताला दुसऱ्या स्थानावर नेले. त्यानंतर महंमद अजमल वरियाथोडी आणि राजेश रमेश यांनी ती मोलाची आघाडी कायम राखली. राजेशने क्षणार्धात अमेरिकेच्या जस्टिन रॉबिन्सनला अँकर लेगमध्ये हरवले आणि स्टेडियममधील चाहते अक्षरशः थक्क झाले.

टी-20 क्रिकेट ठरतोय वन डेसाठी कर्दनकाळ, गेल्या पाच वर्षात 500% वाढले टी-20 सामने

नीरज चोप्रा आणि रिले रेसची आज फायनल

जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला आतापर्यंत केवळ दोनच पदके जिंकता आली होती. 2003 मध्ये अंजू बॉबी जॉर्जने महिलांच्या लांब उडीत कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर भालाफेकपटू नीरज चोप्राने गेल्या वर्षी अमेरिकेतील यूजीनमध्ये झालेल्या चॅम्पियनशिपमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून दिले. यावेळी जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या खात्यात काही पदके येऊ शकतात. आज नीरज चोप्रा, डीपी मनू आणि किशोर जेना पुरुष भालाफेकच्या अंतिम फेरीत खेळणार आहेत. याशिवाय भारतीय संघ 4×400 मीटर रिले शर्यतीच्या अंतिम फेरीत खेळणार आहे.

Tags

follow us