टी-20 क्रिकेट ठरतोय वन डेसाठी कर्दनकाळ, गेल्या पाच वर्षात 500% वाढले टी-20 सामने
Asia Cup 2023 : भारतात पुढील काही दिवस क्रिकेटचा मोठा जल्लोष असणार आहे. क्रिकेटवेड्या भारतीयांना येत्या 30 ऑगस्टपासून आशिया चषकाचा आनंद घेता येणार आहे. त्यानंतर अवघ्या 17 दिवसांनी क्रिकेट विश्वचषकाचा उत्सव भारतातच सुरू होत आहे. या दोन्ही स्पर्धा एकदिवसीय स्वरूपातील आहेत. म्हणजे पुढचे अडीच महिने 50-50 षटकांचे क्रिकेट सामने होणार आहेत. मात्र मागील काही वर्षात वनडे फॉरमॅटचा प्रभाव कमी होतोय का? याची चिंता क्रिकेट प्रेमींना पडू लागली आहे. याचे कारण म्हणजे गेल्या 4 वर्षात एकदिवसीय सामन्यांपेक्षा टी-20 सामने अधिक झाले आहेत.
एका वर्षात चित्र बदलले
T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात 2005 मध्ये झाले होती. तेव्हापासून आतापर्यंतच्या 18 वर्षांत टी-20 मध्ये 2,215 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. पाच वर्षांपूर्वीपर्यंत टी-20 क्रिकेटकडून फारसा धोका नव्हता. फेब्रुवारी 2005 ते 2018 पर्यंत T20 फॉरमॅटमध्ये 717 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले. म्हणजे 1 वर्षात सरासरी 55 सामने झाले. त्याच कालावधीत 1,847 एकदिवसीय सामने झाले. म्हणजे वर्षाला 142 सामने. पण त्यानंतर 2019 पासून चित्र बदलले.
Talathi Bharati Exam : ज्याने पेपर फोडला, तो मुख्य आरोपीच झाला पास, गणेश गुसिंगेला 138 गुण
2019 पासून, 555 एकदिवसीय सामने आणि 1,498 T20 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. म्हणजे वर्षाला सुमारे 120 एकदिवसीय आणि 325 टी-20 सामने झाले. मागील 5 वर्षांत, टी-20 सामन्यांचा वार्षिक दर 490% वाढला, तर एकदिवसीय सामन्यांची संख्या 15% कमी झाली.ऑ
T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या सुरुवातीच्या पहिल्या 13 वर्षांत, दरवर्षी सरासरी 46 कसोटी खेळल्या जात होत्या. 2019 नंतर ही संख्या 39 कसोटींची झाली. एकदिवसीय सामने दरवर्षी 142 ऐवजी 120 होऊ लागले, परंतु T20 ने मोठी उड्डाण घेतली. T20 चे सामने 55 वरून 325 पर्यंत वाढले.
भगवद्गीता की संविधान असा प्रश्न विचारला तर…; शरद पोंक्षेंनी एका क्षणात सांगितलं
जगभरात फ्रेंचायझी लीगची क्रेझ
आयपीएल 2008 मध्ये सुरू झाले. T20 फॉरमॅटमधील ही जगातील पहिली फ्रँचायझी लीग होती. सध्या 14 फ्रँचायझी लीग खेळल्या जात आहेत. वर्षाच्या जवळपास प्रत्येक महिन्यात कुठेतरी फ्रँचायझी लीग होत असते. अनेक स्टार खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडून T20 कडे वळत आहेत. त्यासाठी लवकर निवृत्ती घेत आहे.
क्रिकेट खेळणारे देश वाढले
2019 पासून, T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. 2018 पर्यंतच्या संख्येच्या तुलनेत वार्षिक सामन्यांची संख्या जवळपास 500% वाढली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या काळात अधिकाधिक देशांमध्ये क्रिकेटला चालना देण्याचा प्रयत्न केल्यामुळे हे घडले आहे.
बच्चू कडू मोठे नेते, त्यावर मी काय बोलावं; तटकरेंचा उपहासात्मक टोला
2005 ते 2018 पर्यंत एकूण 23 देशांनी T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याच वेळी, तेव्हापासून आणखी 78 संघ जोडले गेले आहेत. नवीन क्रिकेट खेळणाऱ्या देशांना टी-20 च्या माध्यमातून खेळात प्रवेश करणे सोपे होते.