भगवद्गीता की संविधान असा प्रश्न विचारला तर…; शरद पोंक्षेंनी एका क्षणात सांगितलं

भगवद्गीता की संविधान असा प्रश्न विचारला तर…; शरद पोंक्षेंनी एका क्षणात सांगितलं

Sharad Ponkshe : मी कट्टर हिंदुत्ववादी, सावरकरवादी, सनातन धर्म मानणारा आहे. पण मला कुणी भगवद्गीता की संविधान असा प्रश्न विचारला तर एका क्षणाचाही वेळ न लावता मी संविधान असं उत्तर देईल, असं मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी म्हटलं आहे. हिंदू धर्म वाचवण्याची गरज असल्याचेही शरद पोंक्षे म्हणाले. पण हाच प्रश्न तुम्ही मुसलमानाला विचारा, असेही ते म्हणाले. त्यांनी नुकतीच ‘गप्पा मस्ती’ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी भारत-पाकिस्तानच्या फाळणीवरही भाष्य केले.

बच्चू कडू मोठे नेते, त्यावर मी काय बोलावं; तटकरेंचा उपहासात्मक टोला

शरद पोंक्षे म्हणाले की, मी जर उद्या अमेरिकेत स्थायिक झालो, तिथलं नागरिकत्व घेतलं आणि ठरवलं की आता आयुष्य अमेरिकेत घालवायचं आहे, तर अमेरिकेचं संविधान, त्यांची घटना माझ्यासाठी प्रायोरिटी असेल. माझ्या घरामध्ये भगवद्गीता, जय श्री राम सगळं म्हणेल, मी जंगी देवघर बांधील, सकाळ, दुपार, संध्याकाळ मी पूजा करेल,मात्र घराबाहेर पडलो की मी अमेरिकन असेल असेही शरद पोंक्षे म्हणाले.

Urmila Nimbalkar: उर्मिला निंबाळकर बिग बॉस मराठीत जाणार का? अभिनेत्रीने स्वतः सांगितलं कारण; म्हणाली…

याच कारणामुळे पासपोर्टसाठी हिंदुंना जगभरामध्ये कुठेही अडचण येत नाही. हिंदू नावं दिसली की लगेच पासपोर्ट मिळतो पण खान, सय्यद अशी मुस्लीम नावं आली की थांबवतात. शांततेचा धर्म आहे म्हणून एकीकडे बोंबाबोंब करता, मग एकही मुस्लीम देश शांत का नाही? तिथे त्यांना मारायला हिंदू नाहीत. मग पाकिस्तान एवढे का धगधगते आहे? त्यांना त्यांचा देश वेगळा हवा होता, तो घेतला मग आता राहा की आनंदाने शांत. वेगळे झाले तरी त्यांची काही भावंडे भारतामध्ये राहिली. आमचे तिकडं जात नाहीत.

त्याचवेळी शरद पोंक्षे यांनी भारत पाकिस्तानच्या फाळणीवर भाष्य केले आहे. फाळणी झाली तेव्हा पाकिस्तानमध्ये 15 टक्के हिंदू होते, ते आता फक्त अर्धा टक्का उरले आहेत. भारतात 8 टक्के मुस्लीम होते, ते आता 23 टक्के आहेत.तरी हिंदू राष्ट्र वाईट? हे सगळं कधी संपणार? असा सवालही शरद पोंक्षे यांनी केला आहे. जोपर्यंत हिंदू या देशात बहुसंख्य आहेत, तोपर्यंतच या देशात धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव टिकून आहे. ज्यादिवशी हिंदू 49 टक्के होतील आणि मुस्लीम 51 टक्के होतील, त्यादिवशी सगळं संपलेलं असेल असेही यावेळी शरद पोंक्षे म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube